मुंबई : क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या विवाह होऊन अनेक दिवस उलटले असले तरी त्यांच्यावर अजुनही शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्काला शुभेच्छा देण्यासाठी सर्वात शेवटी दाखल झालीय ती आलिया भट्ट.... 


आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मा दोघीही मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यानिमित्तानं या दोघी एकत्रच स्टेजवर आल्या... आणि याच स्टेजवर आलियानं अनुष्काला लग्नाच्याही शुभेच्छा देऊन टाकल्या. 


स्टेजवर आलेल्या आलियानं माईकचा ताबा घेतला आणि 'ए दिल है मुश्किल' सिनेमाचं एक गाणं तिनं अनुष्कासाठी गायलं... यावेळी तिनं रिसेप्शनला उपस्थित न राहिल्याबद्दल अनुष्काकडे माफीही मागितली आणि हेच आपल्याकडून तुझ्या लग्नाचं गिफ्ट आहे, असं सांगूनही टाकलं... 


या कार्यक्रमासाठी अनुष्का आणि आलिया दोघींनीही अनिता डोंगरे डिझायनर गाऊन परिधान केले होते. या कार्यक्रमासाठी उपस्थितांचं प्रत्येकाचं लक्ष वेधून घेण्यातही त्या यशस्वी ठरल्या. 
 
आलिया सध्या रणवीर सिंग सोबत 'गल्ली बॉय' सिनेमावर मेहनत घेतेय... तर अनुष्का वरुण धवनसोबत 'सुई धागा' आणि शाहरुख खानसोबतच 'झिरो' या चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.