१२ वर्षांनी लहान खेळाडूला डेट करतीये हॉलिवूडची ही अभिनेत्री
हॉलिवूडची अभिनेत्री लॉरा डर्न काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. ती एका बास्केटबॉल खेळाडूसोबत डेटमुळे चर्चेत आली आहे.
नवी दिल्ली : हॉलिवूडची अभिनेत्री लॉरा डर्न काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. ती एका बास्केटबॉल खेळाडूसोबत डेटमुळे चर्चेत आली आहे. अमेरिकेची ही अभिनेत्री दिग्दर्शक आणि निर्मातीही आहे. ५० वर्षीय लॉराच्या प्रेमाच्या चर्चा हॉलिवूडमध्येही सुरू आहेत.
१२ वर्षाने लहान बॉयफ्रेन्ड
लॉरा ही तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान बास्केटबॉल खेळाडू बेरोन डेविसला डेट करत आहे. डेविसहा नुकताच पत्नीपासून वेगळा झालेला आहे. पण दोघांकडूनही त्यांच्या नात्याबाबत अधिकृत काही सांगण्यात आलेलं नाहीये. मात्र दोघांनी नातं पुढे लेव्हलला नेल्याची बातमी पक्की आहे.
फोटोंची चर्चा
बुधवारी यूएस वीकलीने लॉरा आणि डेविसचे काही फोटो प्रकाशित केले आहे. या दोघांचेही फोटो चांगलेच रोमॅंटीक आहेत. यावरून हे दिसून येतं की, दोघेही ऎकमेकांच्या किती जवळ आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचा हा फोटो २० डिसेंबरचा आहे.
लॉराचा घटस्फोट
लॉरा दोन वर्षांपूर्वीच पती बेन हार्परपासून घटस्फोट घेऊन वेगळी झाली आहे. बेनसोबत तिने २००५ मध्ये लग्न केलं होतं आणि दोघांना दोन मुलेही आहेत. त्यानंतर त्यांनी २००३ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तेच डेविसने तीन महिन्यांपूर्वीच पत्नीपासून घटस्फोट घेतला. लॉराने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ती १३-१४ वर्षांची असताना तिचं लैंगिक शोषण झालं होतं. तेव्हापासून ती चर्चेत आली होती.