मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरूण धवन स्टारर 'एबीसीडी २' चित्रपटाची अभिनेत्री लॉरेन गॉटलिब सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती सध्या अमली पदार्थांच्या आहारी गेली असल्याचं कळत आहे. यासंदर्भात खुलासा खुद्द लॉरेनने केला आहे. एका मुलाखती दरम्यान तिने हा खुलासा केला आहे. ''एबीसीडी २' चित्रपटानंतर मी मद्य आणि ड्रग्सचं सेवन अतिप्रमाणात करत होते.' असं वक्तव्य लॉरेनने केलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत ३१ वर्षीय लॉरेनने तिच्या वैयक्तिक जीवनाचा खुलासा केला आहे. 'मी दारू प्यायची, शिवाय ड्रग्स देखील अतिप्रमाणात घ्यायची. मी सगळ्या गोष्टी करायची ज्या मला आनंदी ठेऊ शकतील.' जेव्हा लॉरेन वाईट परिस्थितीत होती तेव्हा तिने पर्यायी हा मार्ग अवलंबलेला होता.


त्याचप्रमाणे ती आठ महिने सतत तिने आनंदी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत होती. आपल्या नाराजीमध्ये आनंद शोधण्यासाठी ती मद्याचे सेवन करायची. 'माझ्या आडचणी इतक्या वाढल्या होत्या की मी माझा चेहरा हसरा ठेवायची पण मनातून मी पूर्ण पणे खचली होती'.


अशाप्रकारे आपल्या वैयक्तिक जीवनातील खळबळजनक खुलासा तिने केला आहे. 'एबीसीडी २' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटानंतर तिच्या नृत्य कौशल्याच्या अभिनयाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. ती एक उत्तम नृत्यांगना आहे. 


त्याचप्रमाणे लॉरेन 'बिग बॉस ११' आणि 'झलक दिखलाजा ६' या रियालिटी शोच्या माध्यमातून घरा-घरात पोहचली होती. याशिवाय तिने अनेक पंजाबी चित्रपट आणि गाण्यांमध्ये देखील झळकली आहे.