Shantabai Kopargaonkar Viral Video : काही कलाकार हे त्यांच्या कलेमुळं इतके मोठे होतात की त्यांना एक पिढी ओळखू लागते. पण, काही कलाकार मात्र परिस्थिती आणि वास्तवाशी झगडताना इतके खचतात की यातून वर येण्यास त्यांना नियतीसुद्धा साथ देत नाही आणि मग सुरु होतो एक हतबल प्रवास. सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ पाहून असंच म्हणावंसं वाटतंय. कारण हा व्हिडीओ साधासुधा नसून एकेकाळच्या लावणी सम्राज्ञीचा आणि जगण्यासाठी, दोन वेळच्या अन्नासाठी सुरु असणाऱ्या तिच्या संघर्षाचा आहे. 


या रावजी... म्हणत लकबीनं हावभाव करणाऱ्या या महिला आते तरी कोण? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वयोवृद्ध महिला (याचक) 'या रावजी, बसा भावजी...' ही लावणी म्हणताना दिसत आहेत. बरं, त्या फक्त लावणी म्हणत नाहीयेत तर, त्यावर सुरेख हावभाव करत त्या शब्दांनाही न्याय देत आहेत. वय वाढलं असलं तरीही या महिलेचे हावभाव आणि हातवारे पाहता त्यांचा कलेशी संबंध असावा असं प्रथमदर्शनी वाटलं आणि तसंच झालं. या महिला दुसऱ्यातिसऱ्या कोणी नसून, त्या आहेत नावाजलेल्या तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर.


लालबाग परळशी नातं...


गिरणगाव अर्थात लालबाग - परळच्या हनुमान थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटाक आणि वन्स मोअर घेत आपली कला सादर करणाऱ्या कोपरगावकर यांनी जवळपास 40 वर्षे तमाशा कलेमध्ये आपलं योगदान दिलं, लावणी गाजवली आणि आपल्या सौंदर्यानं रसिकांना भुरळ पाडली. उत्तर महाराष्ट्रासह, खानदेश गाजवणाऱ्या या लावणी सम्राज्ञीची कला पाहून पुढे कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तारभाई यांनी शांताबाईंच्याच नावानं तमाशा सुरु केला. 


हेसुद्धा वाचा : 'त्या' शिक्षकाला निरोप देताना सारा गाव रडला! Video पाहून तुमचे डोळेही पाणावतील


असं म्हणतात की त्या क्षणापासन शांताबाईंचे चांगले दिवस सुरु झाले, त्या 50-60 लोकांचं पोट भरु लागल्या, पैसा मिळाला प्रसिद्धी तर सोबत होतीच. पण, वय वाढत गेलं, दिवस पालटले आणि तमाशा बंद झाला. नाईलाजानं शांताबाईही पडद्याआड गेल्या आणि त्यांचे बिकट दिवस संकट होऊन त्यांच्यापुढे उभे ठाकले. इतके, की त्यांच्यावर दोन वेळच्या अन्नासाठीही दुसऱ्यांपुढे हात पसरण्याची वेळ आली. 



आज त्या काय करताहेत? 


शांताबाईंना फार क्वचितप्रसंगी सरकारी अनुदान मिळतं. पण, ते 'ना के बराबर'. वय वाढतंय, पण त्यांच्यात भिनलेली ही लावणीच या कठीण काळातही त्यांना साथ देतेय. फाटकी साडी, विस्कटलेले केस, काहींच्या मते ढासळलेलं त्यांचं मानसिक आरोग्य या अशा परिस्थितीशी लढणाऱ्या शांताबाईंच्या मदतीसाठी सध्या काही हात सरसावले त्यातलं एक नाव अरुण खरात. 


सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच शांताबाईंचा शोध घेऊन त्यांना सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांनी गाठलं आणि रुग्णालयात नेत त्यांना वैद्यकिय मदत देऊ केली. इतकंच नव्हे तर सहकाऱ्याच्या साथीनं आता ते शांताबाईंना मिळणारं मानधनात वाढ करण्यासाठी आणि त्यांना राहण्यासाठी ठिकाण मिळवून द्यावं यासाठी राज्य शासनापुढे विनंती करत असल्याची माहितीही मिळते. मुळात सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या परिने करणारे हे प्रयत्न स्तुत्य असले तरीही शासनाचं लोककलावंतांकडे होणारं दुर्लक्ष आणि तत्सम विषय पुन्हा एकदा डोकं वर काढत आहेत.