Swanandi Berde Photoshoot: लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयानं त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला भरपूर आनंद दिला आहे. त्यांच्या विनोदी भुमिका या कायमच गाजल्या आहेत. अशी ही बनवाबनवी (Ashi Hi Banwa Banwi) या चित्रपटातील त्यांची भुमिकाही प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहिली आहे. आता त्यांची पुढची पिढी अभिनयक्षेत्रात उतरली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांची दोन्ही मुलं अभिनय क्षेत्रात आपापलं कतृत्व गाजवत आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगीही मराठी चित्रपटसृष्टीत आपलं असं वेगळं नाव कमावते आहे. (laxmikant berde daughter shares new photo on instagram weaing white dress and glam make up)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी तिने चित्रपट नाही तर नाटकाची निवड केली. लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikan Berde Daughter) यांनी देखील आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकांमधून केली होती. स्वानंदी सोशल मीडियावरही फार सक्रिय असते. ती कायमच आपल्या नव्या लुकनं चाहत्यांना घायाळ करत असते. आता तिचं नवं फोटोशूट चर्चेचा (Laxmikant Berde Daugther Photos) विषय ठरला आहे. आई वडिलांकडून अभिनयाचा प्रगल्भ वारसा तिला प्राप्त असल्यामुळे चाहते देखील तिच्या या फोटोंवर हार्ट पोस्ट करत तिचे कौतुक केले आहे. 


आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'



स्वानंदीनं नुकतंच एक फोटोशूट तिच्या इन्टाग्राम अकांऊटवर शेअर केलं आहे. या फोटोंत ती खूपच सुंदर दिसते आहे (Swanandi Berde Photos). तिनं ऑफ व्हाईट कलरचा लांब लेहेंगा घातला आहे आणि त्यावर तिनं आकर्षक नेटची ओढणी घेतली आहे. तिनं वेगवेगळ्या पोजमध्ये केलेलं हे फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. 


आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे



स्वानंदीचे चाहतेही या फोटोंवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. स्वानंदी सध्या धनंजय माने इथेच राहतात का ? हे नाटक करते. स्वानंदीच्या चाहत्यांना तिला मोठ्या पडद्यावर पाहण्याची प्रचंड उत्सुकता आहे. अभिनयप्रमाणेच आता स्वानंदीही एका बिग बजेट मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.