मुंबई : 44 वर्षांची विद्या बालन  (Vidya Balan) चा सिनेमा 'लव्ह' तर आपल्याला माहितीच आहे. विद्या जिथे जाते तिथे 5 मिटरची साडी घालून जाते. मात्र नुकताच आयोजित केलेला दादा साहेब फाळके हा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री असे कपडे घालून पोहचली की, तिच्या लूकची जोरदार चर्चा होवू लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण यावेळी विद्या साडी नसून रिव्हिलिंग चोलीसह लेहेंगा परिधान करून पोहोचली होती. विद्याचा हा लूक सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. पण हा ड्रेस परिधान करून विद्या कॅमेऱ्यासमोर तिचा स्कर्ट एडजस्ट करताना दिसली. हे पाहून असं म्हणता येईल की, विद्याला तिच्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये 'डर्टी पिक्चर'नंतर पुन्हा एकदा चाहत्यांना दाखवायचा आहे.


विद्या लेहेंगा चोली परिधान करून आली होती
विद्या बालन अवॉर्ड नाईटमध्ये पोहोचताच तिचा लूक पाहून चाहत्यांना पहिल्यांदाच आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर विद्याने रेड कार्पेटवर एकापेक्षा एक किलर पोज दिल्या. यावेळी अभिनेत्रीने बहुरंगी लेहेंगा चोली परिधान केली होती. आणि दुपट्टा खांद्यावर अशा प्रकारे घेतला होता की, जो तिला बोल्ड लूक देत होता. 


घातला होती रिवीलिंग ड्रेस 
विद्या बालनने या लेहेंग्यासह इतकी खुलून दिसणारी चोली घातली आहे की, लोकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. अभिनेत्रीची ही चोली डिपनेक होती, ज्यामध्ये ती कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


विद्या बालनने पापाराझींसमोर पोज देताना या लेहेंगाचा स्कर्ट वर खेचायला सुरुवात केली. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने केसांचा बन बनवला एवढंच नव्हेतर यावेळी तिने अगदी लाईट मेकअप केला होता. विद्या बालन शेवटची 'जलसा' चित्रपटात दिसली होती. विद्याशिवाय या चित्रपटात शेफाली छाया देखील होती.