`काली` वाद आणखी पेटला? शंकर - पार्वतीच्या हातात..., पाहून धक्काच बसेल
`काली` वाद आणखी पेटला? शंकर - पार्वतीच्या हातात `ही` गोष्ट पाहून भक्तांच्या भावना दुखावल्या
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काली ( Kaali) या डॉक्युमेंट्री सिनेमाच्या पोस्टरचा वाद वाढताना दिसत आहे. निर्माती लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) हिच्या काली या डॉक्युमेंट्री सिनेमात काली माता सिगरेट ओढताना दाखवण्यात आली होती. सिनेमाच्या पोस्टरचा वाद वाढत असताना आणखी एक फोटो सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. लीना मणिमेकलाईने आता शंकर आणि पार्वती यांचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये शंकर आणि पार्वती यांची भूमिका बजावत असलेले कलाकार धुम्रपान करताना दिसत आहेत.
लीना मणिमेकलाईच्या पोस्टमुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. याआधीही तिच्या 'काली' सिनेमाच्या पोस्टरवरून वाद निर्माण झाला आहे. फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमुळे अनेक भक्तांच्या भावना दुखावल्याचं चित्र समोर येत आहे.
ट्विटरवर अनेक युजर लीना मणिमेकलाईवर टीका करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'धर्माचा अपमान थांबला पाहिजे.' तर अन्य एका युजरने, 'ती द्वेष पसरवत आहे.' असं लिहिलं आहे. सध्या लीना मणिमेकलाई यांनी शंकर आणि पार्वती यांच्या भूमिकेत असलेल्या कलाकारांचा फोटो पोस्ट केल्यामुळे वाद पेटत आहे.
'काली' सिनेमाच्या आक्षेपार्ह पोस्टवर देशात विविध ठिकाणी FIR दाखल करण्यात आल्या. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मुंबईमध्ये हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्याचा आरोप करत FIR दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागला आहे.