Leonardo Dicaprio Kerala Fish: सध्या लिओनार्डो डायकॅपिरओची सर्वत्र चर्चा आहे. तो अभियासोबत तो एक पर्यावरणवादी आहे. सोशल मीडियावर तो कायमच आपले पोस्ट हे शेअर करत असतो. ज्यात त्यांच्या कामापेक्षा किंवा अभिनयातील काही अपडेट्सपेक्षा तो पर्यावरणाची निगडित अनेक फोटो शेअर करताना दिसतो त्यामुळे त्याच्याही पोस्टची अनेकदा चर्चा रंगताना दिसते. सध्या त्याच्या अशाच एका पोस्टची चर्चा रंगलेली आहे. या पोस्टमध्ये त्यानं शेअर केलेल्या एका माश्याची चर्चा आहे. यावेळी हा माझा केरळमध्ये सापडला आहे आणि त्याविषयीची माहिती आणि उत्सुकता एक पर्यावरणवादी म्हणून त्यानं चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यामुळे त्याला चाहत्यांच्या नानाविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. सध्या त्याची ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होते आहे. त्यामुळे त्याच्या या पोस्टला चाहत्यांचाही आणि इतर पर्यावरणतज्ञ आणि पर्यावरणवादी मंडळींचा उत्सफुर्त प्रतिसाद येताना दिसतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणून घेऊया नक्की या माशाचे वैशिष्ट्यं काय आहे? तेव्हा याबद्दलचा अहवाल काय सांगतो हे आपण समजून घेऊया. पाथला एल लोच Pathala Eel Loach असे या माश्याचे नावं आहे आणि फोटोप्रमाणे तो ग्रे आणि रेड रंगाचा दिसतो आहे. सध्या त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तो म्हणतो की, ''पर्यावरण हे आपल्या आजूबाजूला आहे आणि आता अनेकदा नवी प्रजाती प्राण्यांमध्ये शोधणं हे एका सामान्य दिवशीच होऊ लागलं आहे. भारताच्या केरळ राज्यात स्थानिक असणारे स्टेज डिरेक्टर अब्राहम यांच्याबाबतीतही असंच काहीसं घडलं आहे.


अशाच एका सामान्य दिवशी त्यांना या नव्या प्रजातीचा शोध लागला होता. हे आहेत प्रकाशापासून दूर लपलेले आणि दक्षिण भारतातील केरळ राज्यातील अरुंद जलचरांमध्ये मातीच्या पृष्ठभागाखाली विलग असे नवे पाथला ईल लोचसारखे दिसणारे भूगर्भीय गोड्या पाण्यातील मासे. हा अचानक लागलेला शोध असूनही या माशांचा अभ्यास करणे आणि त्यांचे रहस्य उलगडणे हे काही सोप्पे काम नाही.''


हेही वाचा - फोटोतल्या बर्थडे पार्टीत आहेत 4 स्टार कीड्स; तुम्ही स्पॉट करू शकता?



त्यानं इन्टाग्रामवर शेअर केलेलं हे कॅप्शन Re:wild मधील रिपोर्टमधलं आहे. ही संस्था जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षण करण्यात पुढाकार घेते. यावेळी त्यांच्या या पोस्टनं जगातील पर्यावरणवादी संघटनांचे आणि तज्ञांचे लक्ष वेधले आहे. यावेळी त्याच्या या पोस्टला लाखो लाईक्स आले आहेत. पाच दिवसांपुर्वी त्यानं ही पोस्ट शेअर केली आहे.