Guess Who: फोटोत दिसणारा हा चिमुकला आजचा सुपरस्टार, तुम्हाला ओळखता येतोय का पाहा
बॉलीवूड अॅक्टरेसमध्ये जबरदस्त क्रेझ असलेला `हा` अभिनेता आहे तरी कोण?
मुंबई : सोशल मीडियावर अनेक अभिनेता -अभिनेत्रींचे फोटो व्हायरल होत असतात. काही लेटेस्ट फोटोशुट असतात तर काही लहाणपणीचे फोटो असतात. अनेक अभिनेता -अभिनेत्रींचे लहाणपणीचे फोटो पाहुन त्यांना ओळखण अवघड जात. आता असाच एक फोटो समोर आला आहे. हा अभिनेता तुम्हाला ओळखता येतोय का पाहा.नसेल तर तुम्हाला या अभिनेत्या बाबतची माहिती खाली देण्यात आली आहे.
फोटोत दिसणारा हा मुलगा आता 33 वर्षांचा अभिनेता आहे. या अभिनेत्याच्या पर्सनालिटीवर चाहत्यांसह बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री फिदा आहेत. साऊथच्या चित्रपटांचा मोठा स्टार असला तरी या अभिनेत्याच्या नावाची बॉलिवूडमध्येही बरीच चर्चा आहे. अलीकडेच तो करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्येही दिसला होता.
या अभिनेत्याचा लवकरच एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये तो अनन्या पांडेसोबत दिसणार आहे. आता तुम्हाला समजलेच असेल की फोटोत दिसणारा हा मुलगा दुसरा कोणी नसून विजय देवरकोंडा आहे. अलीकडेच सारा अली खानने 'कॉफी विथ करण'मध्ये विजय देवराकोंडाला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
विजयने तरुण वयातच दक्षिण चित्रपटसृष्टीत स्वत:साठी मोठं स्थान मिळवलं आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. विजयने आपल्या करिअरची सुरुवात रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'नुव्विला'मधून केली होती. मात्र, 'यवेदा सुब्रमण्यम' या चित्रपटातून त्यांना ओळख मिळाली. विजय या चित्रपटात साईड रोलमध्ये होता. यानंतर, 2016 मध्ये विजय 'पेल्ली चोपुलु' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
विजय देवरकोंडाचा 'लिगर' चित्रपट रिलीजच्या तयारीत आहे. ज्यामध्ये तो बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत दिसणार आहे. या चित्रपटातलं 'आफत' चित्रपटाचे दुसरे गाणे रिलीज झाले असून, ते रसिकांच्या पसंतीस उतरले आहे. हा चित्रपट 25 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.