7 सुरांप्रमाणे 7 कलाकारांनी नटलेला चित्रपट `मल्हार` ७ जून ला सिनेमागृहात होणार प्रदर्शित
मुंबई मध्ये एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये फिल्मचे सर्व कलाकार उपस्थित होते. हा चित्रपट 7 जून 2024 रोजी हिंदी आणि मराठीत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : 'मल्हार' चित्रपटातील मुख्य कलाकार अंजली पाटील आणि शारीब हाश्मी आपल्या रोल साठी खूप उत्सुक आहेत. मुंबई मध्ये एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये फिल्मचे सर्व कलाकार उपस्थित होते. हा चित्रपट 7 जून 2024 रोजी हिंदी आणि मराठीत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे कलाकार, निर्माता आणि दिग्दर्शक मुंबईतील 'क्लासिक रहेजा क्लब'मध्ये मीडियाला भेट देण्यासाठी उपस्थित होते. सर्वांचा उत्साह पाहण्याजोगा होता. ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येक कलाकार प्रेक्षकांसोबत संवाद साधत आहेत. आपल्या चाहत्यांना मल्हार पाहण्याचे आवाहन करत आहेत . यावेळी शारीब हाश्मी, अंजली पाटील, ऋषी सक्सेना, श्रीनिवास पोकळे, विनायक पोतदार, मोहम्मद समद, अक्षता आचार्य यांनी माध्यमांना मुलाखती दिल्या. चित्रपटाचे निर्माते प्रफुल्ल पासड आणि दिग्दर्शक विशाल कुंभार यांनीही शूटिंग दरम्यानच्या काही मजेदार घटना शेअर केल्या.
या चित्रपटात तीन कथा सुंदररित्या एकमेकांना जोडून दर्शविल्या आहेत. त्याची एक छोटोशी झलक ट्रेलरमध्ये दिसत आहे. ट्रॅडिशनल ड्रेस मध्ये अंजली खूपच वेगळी दिसत आहे. तर टुरिस्ट गाईड बनलेले शारो हाश्मी देखील कच्छी भाषा बोलताना दिसत आहेत. चित्रपटा बद्दल आपले मत व्यक्त करताना शारीब म्हणतात की प्रेक्षकांनी फिल्म च्या ट्रेलर का खुपच पसंती दिली आहे त्याच प्रकारे चित्रपटालाही असाच भरभरून प्रतिसाद मिळायला पाहिजे.
शारीब हाश्मी आणि अंजली पाटील यांना कच्छी भाषा शिकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. कच्छी भाषा शिकण्यासाठी एका शिक्षकाची देखील अरेंजमेंट करण्यात आला होता. ह्या चित्रपटाची कथा गुजरात मधील कच्छमधील एका गावातील कथा आहे. या मध्ये तीन कथा एकत्र चालत आहेत . यात एक कथा दोन लहान मुलाची आहे , ज्यात श्रवणयंत्र दुरुस्त करण्यासाठी दोघांची धडपड चालू आहे .
अभिनेत्री अंजली पाटील मल्हारमधील तिच्या दमदार व्यक्तिरेखेबद्दल खूप उत्सुक आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत एकाच चित्रपटात अनेक कथा दर्शविल्या जातात, पण भारतात असे चित्रपट फार कमी बनतात, असे त्या म्हणतात. मल्हार चित्रपटातील तीन कथांपैकी एक कथा त्या गावच्या सरपंचाचा मुलगा लक्ष्मण याच्याशी नुकतेच लग्न झालेल्या केसरची आहे. लग्नाला काही दिवस उलटले तरी ती गरोदर राहात नाही म्हणून सासरचे लोक आणि समाजातील लोक तिला सतत टोमणे देत असतात आणि त्याला ती कशी सामोरी जाते हे पाहण्यासारखे आहे. दिग्दर्शक विशाल कुंभारला चित्रपट निर्मितीची प्रचंड आवड आहे, त्यामुळेच मला नवीन दिग्दर्शकासोबत काम करायला मजा येते.
अभिनेता शारीब हाश्मी सांगतात की मल्हार हा संगीतातील एक राग आहे. हा एक संगीतमय सिनेमा आहे, ज्याप्रमाणे संगीतात सात नोट्स आहेत, त्याचप्रमाणे ह्या चित्रपटातही ७ मुख्य पात्र आहेत आणि योगायोगाने हा चित्रपटही ७ जून रोजी प्रदर्शित होत आहे.चित्रपटाचे संवाद सिद्धार्थ साळवी, स्वप्नील सीताराम यांनी लिहिले असून पटकथा विशाल कुंभार, अपूर्व पाटील यांनी लिहिली आहे. छायांकन गणेश कांबळे, संकलन अक्षय कुमार, संगीत टी. सतीश आणि सारंग कुलकर्णी यांचे आहे. हा चित्रपट 7 जून रोजी हिंदी आणि मराठी भाषेतील चित्रपटगृहात एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.