`आखिरी सांसें गिन रहैं है बस...`; व्लॅागर… खून… रहस्य… ‘लाईक आणि सबस्क्राईब’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित
Like Aani Subscribe Trailer : `लाईक आणि सबस्क्राईब` या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला... व्लॅागर… खून… रहस्यानं भरलेलं...
Like Aani Subscribe Trailer : काही दिवसांपूर्वी 'लाईक आणि सबस्क्राईब' या चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा टिझर प्रदर्शित झाला होता. या टिझरमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केले होते. हाच सस्पेन्स अधिक वाढवण्यासाठी आता ‘लाईक आणि सबस्क्राईब’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा रोमांचक ट्रेलर बघून प्रत्येकाच्या मनात आता असंख्य प्रश्नांची मालिकाच सुरू झाली आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जुई भागवत एका व्लॉगरच्या भूमिकेत दिसत आहे. तर तिच्या व्लॉगिंगमुळे ती एका संकटात अडकल्याचे दिसतेय. टिझरमध्ये कोणाचा तरी खून झाल्याचेही दिसत आहे. तर अमृता खानविलकर पोलिसांच्या मदतीनं कोणत्यातरी रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत असतानाच अमेय वाघकडेही काहीतरी गुपित असल्याचे दिसत आहे. हा सगळाच प्रकार संशयित असून नक्की काय पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ट्रेलर पाहून या चित्रपटाची कथा कमाल असणार, हे नक्की! दुसरीकडे 'लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकवर्ग थक्क झाले आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणतात, 'लाईक आणि सबस्क्राईब' हा चित्रपट फक्त एक रहस्यमय कथा नसून आजच्या तरूणाईची कथा सांगणारा चित्रपट आहे. या चित्रपटात प्रत्येक पात्राचं ध्येय वेगळे असलं तरी त्यांचे आयुष्य एकाच ठिकाणी येऊन थांबते. हे सर्वात मोठं रहस्य असून चित्रपटाची औस्त्युक्य वाढवतं . प्रत्येळ वेळी चित्रपटाची कथा एक वेगळं वळण घेणारी असून प्रेक्षकांना खूर्चीला खिळवून ठेवणारी आहे."
नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून 'लाईक आणि सबस्क्राईब'चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, हा चित्रपट 18 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर पाहून नेटकरी त्यावर कमेंट करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, खतरनाक मूवी आहे ही, अप्रतिम कन्सेप्ट मी नक्की बघणार. दुसरा नेटकरी म्हणाला, ट्रेलर पाहून उत्सुकता आणखी वाढलीये... 18 ऑक्टोबरची प्रतीक्षा करू शकत नाही.