मुंबई: किंग खान शाहरुखच्या लेकीचा इंस्टाग्रामवरील फोटो सध्या सगळ्यांचच लक्षवेधून घेतोय. सुहाना खानने नुकतेच काही  फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. सुहाना तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजातील फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.  सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टीव्ह असणाऱ्या सुहानाने नुकतेच काही बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुहाना खान सध्या आई गौरी खानसोबत न्यूयॉर्कमध्ये आहे. न्यूयॉर्कमध्ये पुल साईडवर वेळ घालवातानचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. सुहानाचे हे फोटो गौरी खानने क्लिक केले आहेत. यावर बाबा शाहरुख खानने न चुकता कमेंट केली आहे. ज्यामुळे सुहानाची ही पोस्ट खूपच व्हायरल होऊ लागली आहे.



सुहाना खान आणि शाहरुख या स्टार बाप-लेकीमधील मैत्री  वेळोवेळी दिसून येत असते. बऱ्याचदा शाहरुख मुलीच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करत तिचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. आता देखील शाहरुखने केलेली कमेंट तो एक typical dad असल्याचा पुरावा देणारी आहे.


सुहानाने शेअऱ केलेल्या फोटोत तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि डेनिम शॉर्ट्स घातले आहेत. आणि तिच्या हातात कोल्ड्रींगचा कॅन दिसतो आहे. 
सुहानाने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, " मी असं ठरवू शकते का, की माझ्या हातात असलेला कॅन हा पेप्सीचा आहे आणि मी अमेरिकन मॉडेल Cindy Crawford प्रमाणे पोज देत आहे. "


यावर शाहरुखने आपल्या मुलीचा आत्मविश्वास वाढवतं कमेंटमध्ये म्हटलंय, "मी या फोटोच कौतुक करत असं म्हणू शकतो का ?, की या  फोटोत माझी मुलगी आहे आणि तिच्या हातात कोलाचा कॅन आहे."



सुहानाने आपल्या फोटोची तुलना अमेरिकन मॉडेलसोबत केली आहे, मात्र शाहरुखने सुहानाच्या फोटोवर कमेंट करत ती देखील कोणापेक्षा कमी नाही. आणि माझी मुलगी देखील प्रसिद्ध मॉडेलप्रमाणे पोज देत फोटो काढू शकते, असं म्हणत मुलीच्या फोटोचं कौतुक केलं आहे.