LIPLOCK SCENE IN MARATHI MOVIE: मराठी सिनेमे आता बॉलीवूडला टक्कर देताना दिसतात.कन्टेन्टपासून अगदी ऍक्शन सीन्स असो किंवा शूटिंग लोकेशन असो सगळंच आता बदलत चाललंय.आधी बोल्ड सीन हॉलीवूडमध्येच असायचे,त्यानंतर बॉलीवूडमध्येही सर्रास असे अश्लील सीन दाखवण्यात आले आणि आता मराठी फिल्मी जगतात आता बोल्ड कन्टेन्ट ला सुरवात झालीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 मध्ये आलेला टकाटक सिनेमा आठवतोय ? बोल्डनेसच्या आणि अश्लील संवादाच्या सर्व मर्यादा या सिनेमाने मोडल्या होत्या इतकंच नाही तर लोकांनादेखील हा सिनेमा खूप आवडला होता. या सिनेमाचा कन्टेन्ट जाम आवडला होता.  


आता या सिनेमाचा दुसरा पार्ट येतोय त्याचा टिझर नुकताच प्रदर्शित झालाय.18 ऑगस्ट पासून हा सिनेमा सगळीकडे प्रदर्शित होतोय .टीझरमध्ये अजिंक्य राऊत म्हणजेच 'मन उडू उडू झालं' फेम 'इंद्रा' याचा एक सीन दाखवण्यात आलाय ज्यावरून अजिंक्य खूप ट्रोल होतोय या सीनवरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे . 
टीझरमध्ये अजिंक्यचा लिपलॉक(liplock) सीन आहे,हा सीन पाहून नेटकरी हैराण झालेत अजिंक्य असे सीन देऊ शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीये .मन उडू उडू मध्ये दिसणारा बिनधास्त पण तितकाच संस्कारी इंद्रा एकदम विरुद्ध भूमिकेत पाहून प्रेक्षक संतापले आहेत. 
सोशल मीडियावर आता संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत, ''हे शोभणार नाही'' ,''सिनेमामध्ये असं काही दाखवलं तर सिनेमे चालतात असं नाही '',संस्कृतीला कलंक लावताय '',''फॅमिली सोबत हा सिनेमा कसा पाहायचा '' अशा अनेक कमेंट्स आता पाहायला मिळताहेत.. तर काहीजणांनी अजिंक्यच कौतुक केलयं,काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असदेखील म्हटलंय.



या सिनेमात अजिंक्य सोबत प्रथमेश परब, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे,  आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे असे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत .