मुंबई : 'कोई... मिल गया' हा ऋतिक रोशन आणि प्रीती झिंटाचा २००३ साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट होता.  हा चित्रपट एलियन मॅजिकवर बनवण्यात आला असून या चित्रपटाला मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनी भरभरून प्रेम दिलं. कोई...मिल गया मध्ये, टीना नावाची एक छोटी मुलगी होती. जिच्या व्यक्तिरेखेला देखील प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. ही छोटी टीना आता मोठी झाली असून साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध स्टार आहे. ही टीना दुसरी कोणी नसून हंसिका मोटवानी आहे. जिने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हंसिका मोटवानीचा जन्म ९ ऑगस्ट १९९१ रोजी झाला. हंसिकाने बाल कलाकार म्हणून 'शका लाका बूम-बूम' या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती हृतिक रोशन आणि प्रीती झिंटाच्या 'कोई मिल गया' या चित्रपटातही दिसली होती.


हंसिकाने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षापासून तेलुगू चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. यानंतर ती हिमेश रेशमियाच्या 'आपका सुरुर' या चित्रपटातही दिसली. त्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. हंसिका मोटवानीने 'देसामुदुरु' मधून तेलुगू चित्रपटांमध्ये पदार्पण केलं. तिने 'कंतारी' आणि 'मस्का' या लोकप्रिय तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.



हंसिकाने तमिळमध्ये अनेक यशस्वी चित्रपटही दिले आहेत. ज्यात 'एंग्याम काधल', 'वेलायुधम', 'ओरू काल ओरू कानडी' आणि 'सिंघम 2' यांचा समावेश आहे. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, तिच्याकडे तामिळ आणि तेलगू भाषेतील पाच प्रोजेक्ट आहेत.