Oscars 2023 : आरआरआर चित्रपटाच्या `नाटू नाटू` चा ऑस्‍करमध्ये डंका, बेस्‍ट ओरिजनल गाण्याचा ऑस्‍कर पुरस्‍कार

Mon, 13 Mar 2023-9:47 am,

Oscars 2023 Academy Awards: ऑस्कर अकादमी पुरस्कार लवकरच सुरु होणार आहे. अशात भारतीयांची उत्सुकता ही शिगेला पोहोचली आहे. यंदा भारताला तीन कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळालं आहे. त्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण ही अवॉर्ड प्रेझेंट करताना आपल्याला दिसणार आहे.

Oscars 2023 Academy Awards Live Updates: यंदाच्या वर्षीचं ऑस्कर अकादमी पुरस्कार 2023 आपल्या सगळ्यांसाठी खास आहे. भारतीय तर ऑस्कर 2023 साठी प्रचंड उत्सुक आहेत. ऑस्कर अमेरिकेच्या लॉस एंजलिस येथे सुरु होणार आहे. भारतीयांसाठी यंदाचं वर्षे खूप खास आहे, कारण एस.एस. राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाच्या 'नाटु नाटु' या गाण्याला ऑरिजनल सॉन्ग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं आहे. तर त्यासोबतच 'ऑल दॅट ब्रीथ' या चित्रपटाला बेस्ट डॉक्युमेंट्री कॅटेगरीत आणि 'द एलिफेंट विस्पर्स' या चित्रपटाला बेस्ट शॉर्ट फिल्मसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. (Oscars 2023 Indian Films)  दरम्यान, यासोबतच अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यावेळी अवॉर्ड प्रेझेंट करतानाही आपल्याला दिसणार आहे. दीपिका आधी प्रियांका चोप्रानं 2016 (Priyanka Chopra) आणि 1980 मध्ये पर्सिस खंबाटानंतर आता अवॉर्ड प्रेझेंट करणारी दीपिका तिसरी भारतीय असणार आहे. चला तर जाणून घेऊया ऑस्करच्या लाइव्ह अपडेट्स... 

Latest Updates

  • Oscars 2023 : आरआरआर चित्रपटाच्या नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार 

  • Oscars 2023: Avatar ने पटकवला सर्वोत्कृष्ट व्हिज्युअ इफेक्टचा पुरस्कार
     
    भारतात रिलीज झालेल्या अवतार 2 सिनेमाने Best Visual Effects पुरस्कार पटकवला आहे. 

  • राम चरणची पत्नी उपासनानं शेअर केले ऑस्करमधील खास फोटो शेअर

  • Oscars 2023: बेस्ट ओरिजनल स्कोअर
    'ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट' (All Quiet on the Western Front) चित्रपटाला मिळाला Best Original Score चा पुरस्कार

  • Oscars 2023: बेस्ट प्रोडक्शन डिजाइन
    All Quiet on the Western Front या चित्रपटाला बेस्ट प्रोडक्शन डिजाइनचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. याआधी बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला आहे. 

     

  • Oscars 2023: बेस्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ड फिल्म
    'द बॉय, द मोल, द फॉक्स अ‍ॅड द हॉर्सनं' (The Boy, the Mole, the Fox, and the Horse) बेस्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 

  • Oscars 2023: Natu Natu गाण्याला मिळालं स्टॅंडिंग ओव्हेशन

  • Oscars 2023: भारताला मिळाला पहिला ऑस्कर
    'द एलिफेंट विस्पर्स' या माहितीपटाला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्ममध्ये पुरस्कार मिळाला आहे. 

  • Oscars 2023: बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म
    'ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट' (All Quiet on the Western Front) चित्रपटाला मिळाला इंटरनॅशल फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार

  • पाहा नाटू-नाटूचा पर्फॉर्मंस

  • Oscars 2023: ब्लॅक पॅन्थरला मिळाला बेस्ट कॉस्च्युम डिजाईनचा पुरस्कार
    टब्लॅक पॅन्थर : वकांडा फॉरेव्हरटसाठी (Black Panther Wakanda Forever) बेस्ट कॉस्च्युम डिजाईनचा पुरस्कार रुथ कार्टरला मिळाला आहे. तिचा हा दुसरा पुरस्कार असून ती पहिली ब्लॅक वूमन आहे जिला एकापेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. 

  • Oscars 2023: Ram Charan ला करायचा 'नाटू नाटू' गाण्यावर डान्स? 

  • Oscars 2023: बेस्ट हेअर अ‍ॅंड मेकअप
    'द व्हेल' (The Whale) या चित्रपटाला 95th ऑस्कर 2023 मध्ये बेस्ट हेअर अ‍ॅंड मेकअपचा पुरस्कार मिळाला आहे. 

  • Oscar 2023 : RRR च्या नाटू नाटू गाण्यानं झाली होती सुरुवात 

    जिमी किमेल स्टेजवर मोनोलॉग बोलत असताना नाटू-नाटूच्या डान्सर्स त्याला एस्कॉर्ट करत घेऊन गेले होते. हे पाहता तिथे उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक हे देखील उत्साही झाले होते. 

  • Oscars 2023: बेस्ट सिनेमॅटोग्राफी 
    'ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट' (All Quiet on the Western Front) या हॉलिवूड चित्रपटाला बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला आहे. 

  • Oscar 2023 : लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार

    'आयरिश गुडबाय' (An Irish Goodbye) या चित्रपटानं या कॅटेगरीमध्ये मजल मारली आहे. 

  • Oscar 2023 : बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म
    या कॅटेगरीमध्ये 'ऑल दॅट ब्रीथ' हा भारतीय चित्रपट देखील होता. मात्र, यंदाच्या वर्षी हा पुरस्कार नैवेल्नी (Navalny) ला मिळाला आहे. 

  • Oscars 2023 : एमएम किरावानी यांची हजेरी
    RRR या चित्रपाटातील नाटू नाटू गाण्याला संगीतबद्ध करणाऱ्या MM Keeravaani यांनी पत्नीसोबत ऑस्कर सोहळ्यात हजेरी लावली आहे. 

  • Oscar 2023 : Jamie Lee Curtis ला Everything Everywhere All at Once साठी मिळाला बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस पुरस्कार

    एवरिथिंग एव्हरिवेअर ऑल अ‍ॅट वन्ससाठी आधी Ke Huy Quan ला बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. आता बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्रीचा पुरस्कार जेमी ली कर्टिसला मिळाला आहे. 

  • Oscar 2023 : Ke Huy Quan ला मिळाला बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर

    Everything Everywhere All at Once साठी Ke Huy Quan ला बेस्ट सपोर्टिंग कलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. 

  • Oscar 2023 : Guillermo del Toro च्या Pinocchio​ ला मिळाला बेस्ट फिचर फिल्म पुरस्कार 

    ड्वेन जॉन्सन आणि एमिली ब्लंट यांनी पहिला अवॉर्ड प्रेझेंट केला असून तो Best Animated Feature Film साठी Guillermo del Toro च्या Pinocchio देण्यात आला आहे. 

  • Oscars 2023 :  Malala Yousafzai नं ऑस्कर सोहळ्यात अशी केली एन्ट्री 

    मलाला ही एक सोशल अॅक्टिव्हिस्ट आहे. तिच्या या लूकनं सगळ्यांची मने जिंकली आहेत. व्होग मॅगझिननं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मलालाचा फोटो शेअर केला आहे. 

  • RRR कलाकारांची ऑस्कर सोहळ्यात एन्ट्री 

    दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरनं एन्ट्री केली आहे. राम चरणनं त्याचे फोटो देखील शेअर केले आहेत. 

  • Oscar 2023 Deepika Padukone : ऑस्करसाठी दीपिका तयार

    यंदाच्या वर्षी ऑस्कर प्रेझेंट करणारी दीपिका एकमेव भारतीय आहे. दीपिका त्यासाठी रेडी झाली असून तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे हे फोटो शेअर केले आहेत. दीपिकानं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून ती सुंदर दिसत आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link