मुंबई : अभिनेत्री आणि सुपरबोल्ड मॉडेल पूनम पांडे सध्या कंगना राणौतच्या 'लॉकअप' या रिएलिटी शोमध्ये तिचा किलर लुक फ्लाँन्ट करताना दिसत आहे. काही आठवड्यांपूर्वी, एलिमिनेशन टाळण्यासाठी, पूनम पांडेने चाहत्यांना आणि प्रेक्षकांना आवाहन केलं होतं की जर ती बाहेर जाण्यापासून वाचली तर कॅमेरासमोर ती तिचा टी-शर्ट काढेल. अशातच पूनमला जास्त मतं मिळाली आहेत. आणि ती  सुरक्षित झाली आहे. यानंतर तिने दिलेलं वचनही पाळलं. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने टॉपलेस होण्याचं आश्वासन दिलं आहे. यावेळी तिने आपली ब्राही काढणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-शर्ट आधीच काढले आहेत
यावेळीही पूनम पांडे टॉपलेस होण्याआधी चाहत्यांसमोर तिला मतदान करण्याची अट घातली आहे. पूनमच्या या अटीनंतर तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये, पूनम पांडे म्हणाली की, जर तिला जास्तीत जास्त मतं मिळाली तर ती नॅशनल टेलिव्हिजनवर न्यूड होईल.  'लॉकअप' अंतिम भागाच्या अगदी जवळ आहे. अशा परिस्थितीत, स्पर्धक शोची ट्रॉफी जिंकण्यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून वोटिंगचं आवाहन करत आहेत. दरम्यान, पूनमने चाहत्यांकडून वेगळ्या पद्धतीने वोट मागितले आहेत.


'यावेळी ब्राही नसेल'
पूनमला या वीकेंडला 'लॉकअप'च्या बाहेर जाण्याची भीती आहे. कॅमेऱ्यात बघत ती प्रेक्षकांना म्हणाली, 'तुम्ही मला भरभरून मते दिलीत. तर यावेळी मी टी-शर्ट काढेन. कदाचित ब्राही काढेन. पूनमच्या या विधानाने ती चांगलीच चर्चेत आली आहे. याचबरोबर कंगना राणौतच्या बाजूने अद्यापतरी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


पूनम पांडेची अशी विधानेही तिला शोमध्ये टिकवून ठेवण्यास मदत करत आहेत. यापूर्वीही तिने असंच केलं होतं. 2011 च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान, टीम इंडियाच्या विजयावर तिने कपडे काढण्याचं वचन दिलं होतं. तेव्हाही पूनम चर्चेत आली होती.