मुंबई : बॉलिवूड कलाकारांव्यतिरीक्त इंडस्ट्रीत आपलं स्वत;च एक वेगळ फॅन बेस तयार करणाऱ्या एका स्टार सेलिब्रिटीला रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची घटना घडली आहे. या स्टार सेलिब्रिटीने स्वत: या संदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली आहे. यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना राणौतच्या वादग्रस्त रिअॅलिटी शो 'लॉकअप'चा विजेता मुनव्वर फारुकीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मुनव्वर फारुकीला शूटिंग दरम्यान अपघात झाला आहे. या अपघातात त्याला मोठी दुखापत झाल्याची माहिती आहे. 


मुनव्वर फारुकी हा एक सोशल स्टार होता. मुनव्वरने 'लॉकअप' हा रिअॅलिटी शो जिंकत इंडस्ट्रीत मोठे नाव केले आहे.या विजयानंतर इंडस्ट्रीत त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे या चाहत्यांना याचा मोठा धक्का बसला आहे.  


टेलिचक्करच्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात मुनव्वर फारुकीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चंदीगडमध्ये शूटिंग सुरू असताना मुनव्वर फारुकीच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर मुनव्वर फारुकीवर शस्त्रक्रिया पार पडली. खुद्द मुनव्वर फारुकीनेही सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली होती. 


इंस्टाग्राम लाइव्हवर चाहत्यांशी संवाद साधताना मुनव्वर फारुकीने सांगितले की, दुखापत खूप गंभीर आहे. त्यामुळे  अनेक टाके बसले आहेत. मात्र, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुनव्वर फारुकी त्यांच्या घरी आला आहे. दरम्यान या घटनेनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच मुनव्वर फारुकीच्या प्रकृतीसाठी चाहते प्रार्थना करत आहेत.