Kangana Ranaut Loksabha Nivdnuk Nikal 2024 : लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल आता हळू हळू सगळ्यांना पाहायला मिळत आहे. सकाळी 8 वाजेपासून सुरु असलेल्या मत मोजणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी देखील राजकारणाच्या या मैदानात स्वत: चं निशब आजमावण्याचं प्रयत्न केला आहे. त्यात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचं नाव आहे. कंगना रणौत ही हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून निवडणूक लढताना दिसत आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा सीट ही सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण तिथे भाजपकडून कंगना रणौत आहे तर कॉंग्रेसकडून विक्रमादित्य सिंह होते. त्या दोघांमध्ये यावेळी चुरशीची लढाई पाहायला मिळत होती. कंगनानं यावेळी 72 हजार पेक्षा जास्त मतांनी विक्रमादित्य सिंह यांना पराभूत केलं आहे. कंगनाच्या विजयानं तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगनानं एक पोस्टर शेअर केलं आहे. त्यात कंगनानं एक पोस्टर शेअर केलं असून तिनं सगळ्यांचे आभार मानले आहे. कंगनानं ही पोस्ट शेअर करत कॅप्शन दिलं की 'सगळ्या मंडीच्या रहिवाशांचे दिलेल्या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी मनापासून आभार. हा विजय तुमचा आहे. हा विजय पंतप्रधानांचा आहे आणि भाजपावर विश्वास करा, हा विजय सनातनचा आहे, हा विजय मंडीच्या सन्मानाचा आहे.' 



दरम्यान, सकाळी कंगनानं एएमनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होते की 'मंडीनं कधीच मुलींचा अपमान हा साधारण पद्धतीनं घेतलेला नाही. जिथे माझा मुंबईत जाण्याचा प्रश्न येतो, तर मी कुठेच जाणार नाही. हे हिमाचल माझी जन्मभूमि आहे आणि मी इथल्या लोकांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहिन. पण कोणी दुसरं आहे ज्याला बॅग भरून जावं लागणार आहे. मी कुठेच जाणार नाही.'


हेही वाचा : अमेठीमधून स्मृती इरानी यांना मोठा धक्का! प्रियांका गांधींनी केलं किशोरी लाल यांचे अभिनंदन


मत मोजनीला सुरुवात झाल्यानंतर कंगना रणौतच्या मतांच्या संख्येत घट असल्याची पाहता तिनं धबोही येथे स्थित असलेल्या अंबिका माता मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले होते. त्याचा आधी कंगनानं फोटो शेअर केला होता. त्यासोबत देवीचे आशीर्वाद घेतल्याचे देखील तिनं सांगितले.