Loksabha Election 2024 Kangana Ranaut On Marathi Actress​ Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतसंदर्भात काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचं प्रकरण थेट महिला आयोगाकडे गेलं आहे. महिला आयोगाने सुप्रिया श्रीनेत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी महिला आयोगाने केली आहे. विशेष म्हणजे सुप्रिया श्रीनेत यांनी पोस्ट केलेल्या वादग्रस्त फोटोवर कंगना रणौतने प्रतिक्रिया नोंदवताना महिलांच्या सन्मानाबद्दल भाष्य केलं. मात्र या विधानानंतर आता काँग्रेस समर्थकांनी काही वर्षांपूर्वी कंगाने मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरबद्दल एका टीव्ही मुलाखतीत केलेल्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. महिलांच्या आत्मसन्मानाबद्दल बोलणाऱ्या कंगनाचं या व्हिडीओवर म्हणणं काय आहे असा सवाल विचारला जात आहे.


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी कंगना आणि भाजपावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. मात्र या टिका टिप्पणीदरम्यान काँग्रेसच्या महिला नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन कंगनाचा एक वादग्रस्त फोटो पोस्ट करण्यात आला. सुप्रिया श्रीनेत यांच्या फेसबूक आणि इन्स्टा हा फोटो पोस्ट करण्यात आल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलं. सुप्रिया श्रीनेत यांनी कंगना राणौत यांचा एक बोल्ड फोटो पोस्ट केला होता. या फोटो शेअर करताना त्याला वादग्रस्त कॅप्शनही देण्यात आली होती. मंडीमध्ये काय भाव सुरु आहे? अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली होती. एका महिला नेत्यानेच महिला उमेदवारासंदर्भात अश्लील शब्दांमध्ये भाष्य केल्याने भाजपाने संताप व्यक्त केला होता. यावर थेट कंगनाही सोशल मीडियावर व्यक्त झाली.


कंगनाने नोंदवली प्रतिक्रिया


सुप्रिया श्रीनेत यांच्या अकाऊंटवरील या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत कंगाने आपला आक्षेप नोंदवला. "कलाकार म्हणून मी गेल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत सर्व प्रकारच्या महिलांच्या भूमिका साकारल्या आहेत. 'राणी'मधील एका भोळ्या मुलीपासून ते 'धाकड'मधील मोहक नावाच्या गुप्तहेरापर्यंत आणि 'मणिकर्णिका'मधील 'देवी'पासून 'चंद्रमुखी'तील 'राक्षसा'पर्यंत, 'रज्जो'मधील 'वेश्ये'पासून 'थलाईवी'तील क्रांतिकारी नेत्यापर्यंत अनेक भूमिका मी साकारल्या. आपणच आपल्या (देशातील) लेकांनी पूर्वग्रहांच्या बंधनातून मुक्त करायला हवं. त्याचप्रमाणे वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचा अशाप्रकारे अपमान करणं थांबवलं पाहिजे. प्रत्येक स्त्री ही सन्मानास पात्र आहे," अशा प्रदीर्घ कॅप्शनसहीत कंगनाने सुप्रिया श्रीनेत यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला.



कंगना जेव्हा स्वत: उर्मिलाला सॉफ्ट पॉर्नस्टार म्हणालेली


कंगनाची ही प्रतिक्रिया वाचून आता काँग्रेसच्या अनेक समर्थकांनी तिला काही वर्षांपूर्वीच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कंगनाने अभिनेत्री उर्मिलाला सॉफ्ट पॉर्नस्टार म्हटलं होतं. "मला तिकीट मिळवणं फार कठीण नाही. त्यासाठी मला माझा जीव धोक्यात टाकावा लागणार नाही किंवा संपत्ती भाड्याने द्यावी लागणार नाही. आता उर्मिला मातोंडकरच पाहा. ती सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. ती तिच्या अभिनयासाठी ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्न्ससाठी. जर तिला तिकीट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार?" असं कंगना या व्हिडीओत म्हणताना दिसते. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. 


1) 



2)



श्रीनेत यांचं स्पष्टीकरण


हे प्रकरण तापल्यानंतर सुप्रिया श्रीनेत यांनी स्पष्टीकरण दिलं. "माझ्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटचा गैरवापर करून एका व्यक्तीने अत्यंत घृणास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट केली. ही पोस्ट आता माझ्या अकाऊंटवरुन काढून टाकण्यात आली आहे. जे मला ओळखतात त्यांना ठाऊक आहे की मी स्त्रियांबाबत असं कधीच बोलणार नाही. माझ्या नावाचा गैरवापर करणारे पॅरेडी अकाऊंटही सुरू आहे. या माध्यमातून यापूर्वीही अनेकदा वागद्रस्त विधानं आणि टीप्पण्या करण्यात आल्या आहेत. मी यासंदर्भात ट्विटरकडे तक्रार नोंदवली आहे. याच खात्यावर करण्यात आलेली पोस्ट माझ्या टीममधील कोणत्या व्यक्तीने कॉपी पेस्ट करुन माझ्या खात्यावरुन शेअर केली. मी कधीही कोणत्याही महिलेबद्दल असं विधान करणार नाही," असं सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलं आहे.




कंगना आता तिच्या या जुन्या व्हायरल व्हिडीओवर काय प्रतिक्रिया देते हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.