ओळखलंत का? सपना चौधरीचा जबरदस्त मेकओव्हर
सपना चौधरीचा मेकओव्हर
मुंबई : बिग बॉस सिझन 11 मधून लोकप्रिय झालेली प्रसिद्ध अभिनेत्री हरियाणवी डान्सर सपना चौधरी सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. याअगोदर सपना चौधरी हरियाणातील एक लोकप्रिय चेहरा होती. मात्र आता तिची ओळख जगभर पसरली आहे. बॉलिवूड ते भोजपुरी सिनेमांमध्ये सपना चौधरीची चर्चा आहे. या सगळ्यामध्ये आता सपना चौधरीचा एक नवा अवतार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कायम सलवार - सूटमध्ये दिसणारी सपनाचा आता जबरदस्त मेकओव्हर झाला आहे. सपना चौधरी कायम पंजाबी ड्रेसवर परफॉर्म करताना दिसली मात्र आता सपनाने लूक बदलला आहे. फरीदाबादमध्ये सपना चौधरी साडी नेसून परफॉर्म करताना दिसली आहे तर नाशिकमध्ये तर ती चक्क मराठमोळ्या स्टाइलमध्ये दिसली आहे.
सपना चौधरी आता वेस्टर्न लूकमध्ये चाहत्यांसमोर आली आहे. सपना चौधरीने इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केली आहे. या फोटोत सपना चौधरी अगदी अलग लूकमध्ये दिसत आहे. तुम्ही देखील पाहा सपनाचा हा नवा मेकओव्हर
सपना चौधरीचे हे फोटो सध्या चाहत्यांना धक्का देणारे ठरत आहेत.
तिच्या या लूकमध्ये ती अगदी वेगळी आणि सुंदर दिसत आहे. ब्लॅक रंगाच्या शिमर टॉपसोबत सपना चौधरीने केसात फूल माळलं आहे. आता सपना अभय देओल आणि पत्रलेखाचा सिनेमा 'नानू की जानू' या सिनेमांत डान्स परफॉर्म करताना दिसणार आहे. तसेच एका नव्या भोजपुरी गाण्यात देखील सपना चौधरी दिसणार आहे.