Salman Khan Death Threat Case : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थातच सलमान खानला (Salman Khan) सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे त्याच्या सुरक्षेतही वाढ केली आहे. याचदरम्यान सलमान खानला मेलद्वारे धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसांनी लुकआऊट नोटीस (Lookout Notice) जारी केली. मिळालेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीने गँगस्टर गोल्डी ब्रारच्या (Gangster Goldie Brar) नावाने धमकीचे ईमेल पाठवला होता. मार्चमध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटला ईमेलमध्ये म्हटले होते की, गोल्डी ब्रारशी बोला अन्यथा पुढच्यावेळी मोठा धक्का देईन, असे लिहिले होते. यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली आणि एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका टीव्ही शोमध्ये मुलाखत देताना, सलमानने त्याला जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या Y+ सुरक्षेबद्दल सांगितले. या संदर्भात सलमान म्हणाला होता 'लापरवाहीपेक्षा सुरक्षा चांगली असते. मला सुरक्षा देण्यात आली आहे. आता रस्त्यावर एकट्याने सायकल चालवून कुठेही जाता येत नाही. रस्त्यावरून प्रवास करताना वाहनांचा ताफा सोबत असतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. माझ्या चाहत्यांना याचा त्रास होतो याचे वाईट देखील वाटते. सलमान खानला मिळणाऱ्या सततच्या धमक्यांमुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षेचा विचार करून सलमानने निसानकडून नवी बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीला मिळणाऱ्या धमक्यांवर पोलीस तातडीने कारवाई करत आहेत.


याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या हरियाणातील तृतीय वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्याविरुद्ध लुक आउट सर्कुलर (LOC) जारी केले आहे. ज्याने बॉलीवूड अभिनेता सलमान खानला ईमेल द्वारे धमकी दिली होती. प्राथमिक तांत्रिक तपशील तपासल्यानंतर पोलिसांना यूकेमधून पाठवलेला ई-मेल सापडला आहे. हरियाणातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी यासंदर्भात लुकआउट परिपत्रक काढल्याचे समजल्यानंतर पोलिसांना पत्र पाठवले.


नेमकं प्रकरण काय ?


सलमान खानला एका पत्रकार परिषद त्याला मिळणाऱ्या धमकीबाबत विचारणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेत त्याला मिळणाऱ्या धमकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सर्वांचे भाईजान आहात मग तुम्हाला मिळणाऱ्या धमकीकडे कसे पाहता, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सलमान खानने उत्तर देताना म्हटलं की, मी सगळ्यांचा भाई नाही, कुणाच्या तरी 'भाई' आहे.. तर कुणाचा तरी 'जान'. असे उत्तर देऊन सलमान खानने थेट धमकीचे उत्तर देणे टाळले.


सलमान खानला धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले होते. ज्यामध्ये 'गोल्डी भाई (गोल्डी ब्रार)ला सलमान खानशी बोलायचे आहे. लॉरेन्स बिश्नोई यांची मुलाखत तुम्ही पाहिलीच असेल. तुम्ही पाहिलं नसेल तर सांगा. हे प्रकरण बंद करायचे असेल तर हे प्रकरण मिटवा. समोरासमोर बोलायचे असेल तर सांगा. आता वेळीच कळवले आहे. पुढच्या वेळी फक्त झटकाच बसेल, अशी धमकी देणारा ई-मेल पाठवण्यात आला होता. 


सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याचे कुटुंबीय खूपच चिंतेत आहेत. सगळ्यांनाच सलमान खानची काळजी आहे. त्यामुळे सलमान खानने सध्या शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सलमानच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, सलमान धमक्यांना घाबरत नाही, त्यामुळे तो सर्वकाही अगदी सामान्य पद्धतीने घेतो.