प्रेम वगैरे ठिक, पण लग्न नको रे बाबा! असं का म्हणतोय हा आघाडीचा अभिनेता
`Eternally Confused and Aager for Love` ही सिरीज 18 मार्चपासून `Netflix` वर प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : अभिनेता राहुल बोसची नेटफ्लिक्सवरील 'इटरनली कन्फ्यूज्ड एंड इगर फॉर लव' या सिरीजमध्ये एका युवकाच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. जो त्याच्या भावना समजून घेण्यासाठी धडपडत आहे. आपल्या तरुणपणाची आठवण करून देत बोस म्हणाले की, ते तेव्हा देखील त्यांना स्पष्ट होतं की, त्याला "सुंदर नातं" हवं आहे, मात्र त्याच रूपांतर लग्नात कधीच करायचं नाही हेही त्याला तेवढचं स्पष्ट होतं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप कमी बोलणार अभिनेता बोसला जेव्हा विचारण्यात आलं की, त्याच्या कोणत्या वयाच्या टप्प्यावर त्याने सगळ्यात जास्त प्रेमाचा विचार केला.
यावर बोस म्हणाले, ''54 वर्षीय. मी तुम्हाला काय सांगू, की, मला किती प्रमाणात प्रेम हवं होतं... पण वयाच्या 18 व्या वर्षी मी कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा माझी आई म्हणाली की "येत्या पाच-दहा वर्षात बघू". ती जिवंत असती तर तिला कळलं असते की मी बरोबर आहे.''
मुंबईत जन्मलेला अभिनेता म्हणाला, "प्रेम, एकता, एकत्र राहण? हो हे खरं आणि खुशीने भरलेलं लांब आणि सुंदर नातं? हो, पण लग्न माझ्यासाठी नाही'' " 'Eternally Confused and Aager for Love' ही सिरीज 18 मार्चपासून 'Netflix' वर प्रदर्शित होणार आहे.