मुंबई : सध्या सर्वत्र 'पुष्पा' स्टारर अभिनेता अल्लू अर्जुनची चर्चा आहे. दाक्षिणात्य सिनेविश्वातील अभिनेत्याने सर्वांच्या मनात राज्य केलंय. वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येत देखील दिवसागणिक वाढ होत आहे. अल्लू अर्जुनची पत्नी, त्याचं कुटुंब इत्यादी गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. आज आपण त्याच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेणार आहोत. अर्जुनच्या पत्नीचं नाव स्नेहा रेड्डी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहे स्नेहा रेड्डी? 
अनेक वर्षांपूर्वी स्नेहा आणि अर्जुनची भेट त्यांच्या एका मित्राच्या लग्नात युएसमध्ये झाली होती. तेव्हा पहिल्या नजरेतचं स्नेहाने अर्जुनच्या मनावर राज्य केलं. तेव्हा  अर्जुनला झालेलं ते प्रेम एकतर्फी होतं.



लग्नात दोघे एकमेकांसोबत बोलले देखील नव्हते. तेव्हा अभिनेत्यांच्या मित्रांनी स्नेहाला मेसेज करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला. प्रेमाचा प्रश्न होता, त्यामुळे अल्लूने स्नेहाला मेसेज केला. 


त्यानंतर स्नेहाने देखील अल्लूच्या मेसेजचं उत्तर दिलं. उत्तरानंतर फोनवर अनेक दिवस संवाद साधल्यानंतर, दोघांनी पुन्हा भेटण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. 



कालांतराने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीचे काही दिवस दोघांनी नातं गुपित ठेवलं. अनेक वर्ष डेट  केल्यानंतर अल्लूच्या वडिलांना मुलाच्या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती मिळाली. 


त्यांनंतर अल्लूने वडिलांसमोर स्नेहासोबत प्रेम करत असल्याची कबुली दिली आणि स्नेहासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. अखेर अल्लू आणि स्नेहा सात जन्माच्या बंधनात अडकले.