मुंबई: अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कृति सेनन यांच्या 'लुका छिपी' सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले. 'ये खबर छपवा दो अखबार में, पोस्टर लगवा दो बाजार में' असे या गाण्याचे बोल असून अभिनेता अक्षय कुमार आणि उर्मिला मातोंडकर यांच्या 'अफलातून' सिनेमाचे रिमेक आहे. गाण्यात कार्तिक-कृति यांनी अक्षय-उर्मिला यांच्या पावलावर पाउल ठेवल्याचे दिसून येत आहे. गाण्यात कार्तिक-कृति यांची जोडी कमालीची दिसत आहे. गायक मिका सिंग आणि सुनंदा शर्मा यांनी हे गाणे गायले आहे. 
 
९० व्या शतकातील या गाण्यामध्ये कार्तिक-कृति यांचे अनोखे अंदाज चाहत्यांना अनुभवता येणार आहे. या गाण्याचे प्रमोशन खुद्द खिलाड़ी अक्षय कुमारने केले. कार्तिकने स्वत:च्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन गाण्याचा प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये अक्षय सुद्धा असल्याचे दिसत आहे. कार्तिकने व्हिडिओ शेअर करत 'पोस्टर लगेंगे फिर एक बार, जब साथ होंगे मेरे फेवरेट मिस्टर खिलाड़ी' असे कॅप्शन दिले. कार्तिक- कृति यांनी आपले गाणे प्रदर्शित झाले असल्याची बातमी सोशल मीडियावरुन चाहत्यांना कळवली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



बोल्ड विनोदी असलेल्या 'लुका छिपी' सिनेमाची गोष्ट ट्रेलरच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर आली. सिनेमात कार्तिक-कृति लिव-इन मध्ये राहत असतात. नंतर त्यांच्या घरातल्यांचा त्यांनी पळुन लग्न केले असल्याचा गैरसमज होतो. त्यानंतर हे जोडपे कुटुंबात एका जोडप्याप्रमाणे राहतात. सिनेमाची निर्मिती दिनेश विज़ान यांनी केली आहे. १ मार्च रोजी 'लुका छिपी' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.