Actress Maanvi Gagroo Engaged : अ‍ॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'फोर मोर शॉट्स प्लीज' (Four More Shots Please!) या वेब सीरिजनं सगळ्यांची मने जिंकली. या मालिकेतील अभिनेत्री मानवी गाग्रुचा (Maanvi Gagroo) साखरपुडा झाल्याचे समोर आले आहे. मानवी ही फोर मोअर शॉट्स प्लीज या सीरिजमध्ये सिद्धी पटेल ही भूमिका साकारत होती. मानवीनं अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. (Maanvi Gagroo Engaged) मानवी ही एक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मानवी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच मानवीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरून तिचा साखरपुडा झाल्याचे म्हटले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानवीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. मानवीनं यावेळी तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मानवीनं तिच्या हातात असलेली अंगढी दाखवली आहे. तर मानवी आनंदी असल्याचे दिसत आहे. तर मानवीनं तिच्या तोंडावर हात ठेवत तिची डायमंड रिंग दाखवली आहे. हा फोटो शेअर करत मानवीनं 'तर हे झालं #Engaged', असे कॅप्शन दिले आहे. 



मानवी गागरूची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. मानवीची सह-कलाकार बानी जे ने कमेंट करत लिहिले की, 'अरे हॅलो. आम्हाला बऱ्याच काळापासून माहित आहे, परंतु हो, आम्हाला या पोस्टची प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत मानवीला शुभेच्छा दिल्या आहेत. 


हेही वाचा : Alia- Ranbir ते Mouni Roy - Suraj Nambiar पर्यंत... 'हे' 6 सेलिब्रिटी कपल साजरी करणार पहिली Lohri


मानवीनं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो शेअर केलेला नाही. इतकंच काय तर तिनं होणाऱ्या नवऱ्याचे नावही उघड केले नाही. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांना वाटले की मानवी ही त्यांच्यासोबत विनोद करत आहे. तिनं हे एखाद्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी शेअर केले आहे. तर मानवीनं इतकी गोड बातमी दिल्यानं काही चाहत्यांना आनंद आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाहायचे असल्याचे म्हटले आहे. मानवीनं अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केलं आहे.