मुंबई : बॉलिवूड दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी, त्यांची 'हवा हवाई' प्रतिमा आजही लोकांच्या मनात कायम आहे. श्रीदेवी यांच्या ५६व्या वाढदिवशी जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयाकडून श्रीदेवी यांचा मेणाचा पुतळा बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवींचा मादाम तुसाँ सिंगापूर येथे बनवण्यात येत असलेला मेणाचा पुतळा अतिशय खास आहे. २० आर्टिस्ट्सची टीम यासाठी काम करत आहे. या संपूर्ण टीमने श्रीदेवी यांच्या कुटुंबियासोबत चर्चा करुन त्यांची पोज, हावभाव, मेकअप, आइकॉनिक आउटफिट रिक्रिएट करण्याचं काम केलं आहे. श्रीदेवी यांच्या पुतळ्यावर गेली पाच महिने काम सुरु आहे.


रिपोर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीदेवी यांचा आउटफिट रिक्रिएट करणं सर्वाधिक आव्हानात्मक असल्याचं सांगतिलं. श्रीदेवीचा मुकुट, कानातले आणि ड्रेसमधील थ्रीडी प्रिंट अनेक चाचण्यांनंतर, अतिशय बारकाईने पूर्ण करण्यात आली असल्याचं सागितलं.



'मिस्टर इंडिया' चित्रपटातील श्रीदेवींचा 'हवा हवाई' गाण्यातील आयकॉनिक लूक रिक्रिएट करण्यात येत आहे. श्रीदेवी यांच्या या मेणाच्या पुतळ्याचं सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातील अधिकृतपणे बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्याद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे.