Madhur Bhandarkar Birthday: बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता मधुर भांडारकरचा आज वाढदिवस आहे. वास्तववादी चित्रपट बनवण्यात हातखंडा असलेल्या मधुर भांडारकर यांना त्यांच्या दुसऱ्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसंच, पद्मश्रीनेही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आज बॉलिवूडमध्ये मधुर भांडारकर यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, तिथपर्यंत पोहोचण्यासाठीही त्यांना संघर्ष करावा लागला होता. आज मधुर भांडारकर यांची नेटवर्थ 75 कोटींच्या आसपास असल्याचे बोललं जात आहे. एकेकाळी कॅसेटची विक्री करुन घर चालवणाऱ्या मधुर यांनी स्वतःच वेगळं विश्व निर्माण केलं आहे. जाणून घेऊया त्यांचा थक्क करणारा प्रवास.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधुर भांडारकर यांनी चांदनी बार, पेज 3, ट्रॅफिक सिग्नल आणि फॅशनसारखी सर्वोत्तम चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. ते त्यांच्या चित्रपटातून सामाजिक विषय प्रेक्षकांसमोर आणतात. वास्तववादी चित्रपट ही त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर बेधडकपणे त्यांचे विचार मांडण्यासाठीही ते घाबरत नाहीत. या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा लहानपणापासूनचा प्रवास मात्र खडतर होता. मधुर यांचा जन्म 26 ऑगस्ट रोजी 1968 साली एका मराठी कुटुंबात झाला. त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं होतं. त्यामुळं लहान वयातच त्यांना अनेक ठिकाणी छोटीमोठी कामं करावी लागली. सुरुवातीला ते कॅसेट स्टोरवर काम करत होते. तर, एकेकाळी त्यांनी ट्रॅफिक सिग्नलवर च्युइंग गमदेखील विकले. मात्र, या कठिण काळात त्यांनी खूप काही शिकलं आणि त्यामुळंच त्यांना यशदेखील मिळालं. 


मधुर जेव्हा कॅसेट स्टोअरमध्ये काम करत होते तेव्हा त्यांनी बऱ्याचदा चित्रपट पाहत होते. त्याचवेळी त्यांनी फिल्म मेकिंगचा बारकाईने अभ्यास केला. त्याचवेळी त्यांनी या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला. सुरुवातीला त्यांनी छोट्या मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांचा पगार 1 हजार रुपये इतका होता. त्यानंतर त्यांनी स्वतःच फिल्म मेकिंग सुरु केलं. त्यांनंतर एकापाठोपाठ एक हिट चित्रपटांचा धडाका त्यांनी लावला. त्यामध्ये चांदनी बार, फॅशन या चित्रपटांचे नाव आवर्जुन घेतले जाते. 


मधुर भांडारकर यांनी राम गोपाल वर्मा यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं होतं. या काळात त्यांना 1995 साली आलेल्या रंगीला चित्रपटात काम करण्याची संधीदेखील मिळाली होती. दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट त्रिशक्ती 1999 साली प्रदर्शित झाला होता. मात्र तो फ्लॉप ठरला. त्यानंतर दोन वर्षांनंतर मधुर यांनी 2001 साली तब्बूसोबच चांदनी बार चित्रपट बनवला. हा चित्रपट खूप चालला. चांदनीचा चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट सोशल फिल्मचा पुरस्कारदेखील या चित्रपटाला मिळाला आहे.