Madhuri Dixit Misal Recipe Video: अभिनेत्री माधुरी दीक्षित ही आपल्या नृत्यासाठी आणि उत्कृष्ट अभिनयासाठीही ओळखली जाते. सोशल मीडियावरही माधुरी प्रचंड चर्चेत असते. ती आपल्या चाहत्यांनाही कायमच अपडेट ठेवत असते. काही दिवसांपुर्वी ती आपला मुलगा रियानमुळे चर्चेत आली होती. रियाननं आपली हायस्कूल डिग्री पूर्ण केली आहे. त्यामुळे याचा फोटो माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यावर त्यांच्या चाहत्यांनी तूफान कमेंट्सचा पाऊस पाडला होता. आता माधुरीची अजून एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगली आहे. या व्हिडीओत माधुरी चक्क मिसळ बनवताना दिसते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिसळ हा पदार्थ आपल्या सगळ्यांनाच प्रचंड प्रमाणात आवडतो. आपणही तो अगदी आवडीनं खातो. आपण कुठेही फिरायला गेलो आणि आपल्याला जर का मिसळ खायची असेल तर आफण त्यावर ताव मारल्याशिवाय राहत नाहीच तेव्हा आपणही मिसळ खाण्यासाठी जिवाचं अगदी रानं करतो. डोळ्यात पाणी येईपर्यंत आपण मिसळ खाण्याची धडपड करत असतो. त्यामुळे मिसळ खाण्याची हौस ही आपल्या सर्वांचीच आहे. सध्या माधुरीलाही याचा मोह आवरता आलेला नाहीये. माधुरी दीक्षितनं असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तेव्हा सगळीकडेच फक्त त्या व्हिडीओचीच चर्चा आहे. 


तुम्हाला माहितीच आहे की माधुरी दीक्षितचं स्वत:च युट्यूब चॅनल आहे. ती आपल्या युट्यूब चॅनलवरून नानाविध पदार्थ आपल्या पतीसोबत बनवताना दिसते. त्यामुळे तिचे हे व्हिडीओ कायमच चर्चेत असतात. आत्तापर्यंत त्यांनी अनेक व्हिडीओज केले आहेत. त्यामुळे त्यांच्या या व्हिडीओजला प्रचंड व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या त्यांनी अपलोड केलेल्या मिसळ पावच्या रेसिपीच्या व्हिडीओलाही प्रचंड व्ह्यूज मिळत आहेत. 


हेही वाचा - फॅशन आयकॉन मलायकाकडून करिश्मा कपूरच्या लेकीचा लुक कॉपी? चाहत्यांचा सवाल


यावेळी माधुरी मिसळ कशी बनवायची आणि तीही हेल्थी मिसळ कशी बनवायची याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या व्हिडीओमध्ये मिसळ बनवायचे साहित्य, त्याचे प्रमाण आणि कृती सांगितली आहे. यामध्ये किती कॅलरीज असतात यावरही त्यांनी भाष्य केले आहे. सध्या त्याचा एक छोटासा व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने हे मराठी आहेत त्यामुळे तेही अनेक मराठी पदार्थंचे व्हिडीओजसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. यावेळी त्यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला अनेक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे तुम्हालाही घरच्या घरी मस्त चमचमीत मिसळ करायची असेल तर तुम्हीही हा व्हिडीओ नक्कीच पाहू शकता.