मुंबई : बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थातचं माधुरी दीक्षितच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. वयाच्या पन्नासाव्या वर्षी देखील माधुरीचं सौंदर्य इतरांना लाजवेल असं आहे. सौंदर्यासोबतचं देवाने तिला भेट म्हणून नृत्य कलेचं वरदान दिलं आहे. तिचा डान्स पाहाण्य़ासाठी चाहते आजही तितकेचं उत्सुक असतात. तर माधुरीच्या चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. माधुरीने 'डान्स दिवाने 3'च्या सेटवर डान्सिग क्विन आणि अभिनेत्री नोरा फतेहीसोबत ताल धरला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोरा आणि माधुरीचा भन्नाट बेली डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'डान्स दिवाने' च्या सेटवर नोरा पुहुणी म्हणून आली होती. यावेळी माधुरीने नोराला 'मेरा पिया घर आया' डान्स शिकवला. तर दुसरीकडे नोराने माधुरीला 'दिलबर दिलबर' गाण्यावर ठेका धरायला भाग पाडलं. 


माधुरीचा धमाकेदार बेली डान्स पाहून खुद्द नोरा देखील थक्क झाली. सांगायचं झालं तर माधुरीने  अनेक बॉलिवूड गाण्यावर ताल धरत चाहत्यांच्या मनात एक वेगळं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. माधुरी कथक या नृत्यशैलीत पारंगत आहे. पण तिने बेली डान्सवर धरलेला ठेका देखील तितकाच भन्नाट आहे.