या रियालिटी शो मधून माधुरी करतेय छोट्या पडद्यावर कमबॅक!
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागम करत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागम करत आहे. खूप काळानंतर ती रियालिटी शो मध्ये परतत आहे. कलर्सवर सुरु होत असलेल्या नव्या डान्स दिवाने या शो मध्ये जज म्हणून माधुरी दिसणार आहे. माधुरीसोबत शशांक खेतान आणि कोरिओग्राफर तुषार कालिया जज म्हणून दिसेल. या शो ची खासियत म्हणजे यात लहान मुले, तरुण आणि वयस्क अशा तीन वयोगटात वर्गवारी करण्यात आली आहे. यात सहभागी झालेल्या स्पर्धकांना आपल्या श्रेणीतील स्पर्धकांशी स्पर्धा करायची आहे.
याबद्दल माधुरी काय म्हणतेय?
या शो बद्दल माधुरी दीक्षित बोलली की, भारतातील तीन पिढ्यांना परफार्म करण्यासाठी एक कॉमन प्लेटफॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे, हा या शो चा युएसपी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या वयोगटातील डान्सरची पॅशन आपल्याला सेलिब्रेट करता येईल. माझ्यासाठी नृत्य ही एक पॅशन आहे. शो सुरू होण्यासाठी मी फार उत्सुक आहे. कारण त्यानंतरच आपल्याला भारतातील अस्सल डान्स दिवाने भेटतील.
शशांक खेतान म्हणाले...
तर शशांक खेतान यांनी सांगितले की, डान्स दिवानेच्या निमित्ताने मी रियालिटी शोमध्ये सुरुवात करत आहे. वय ही अडचण नसलेल्या प्रतिभावान डान्सरचा शोध आम्ही घेत आहोत. नृत्याच्या वेडावर भारताला नाचवण्याची आमची इच्छा आहे. माधुरीसोबत ज्युरी पॅनलवर बसणे हा एक सन्मान आहे. शो चे शूटिंग सुरु होण्याची मी वाट पाहत आहे.
हा आनंददायी अनुभव
कोरिओग्राफर तुषार कालिया म्हणाला की, एक स्पर्धक ते बॉलिवूड कोरिओग्राफर आणि आता जज पर्यंत पोहचलेला हा प्रवास माझ्यासाठी मोठा असला तरी यश देणारा आहे. माझ्यासाठी माधुरी मॅम आणि शशांक खेतान यांच्यासोबत जजच्या पॅनलमध्ये बसणे हा नक्कीच आनंददायी अनुभव असणार आहे.
या सिनेमातून माधुरी प्रेक्षकांच्या भेटीला
लवकरच माधुरी कलंक या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात ती डान्स टिचरची भूमिका साकारत आहे. तर माधुरीचा पहिला मराठी सिनेमा बकेट लिस्ट लवरकच प्रदर्शित होईल.