भर पार्टीत Madhuri Dixit च्या प्रेमात डॉक्टर नेनेंनी जे केलं, पाहणारे पाहतच राहिले...
दोघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना फिल्म इंडस्ट्रीची डान्सिंग क्वीन म्हटले जाते. माधुरीच्या डान्सचे लाखो चाहते आहेत, पण तुम्ही कधी तिचे पती डॉक्टर पती श्रीराम नेने यांना डान्स करताना पाहिलं आहे का? कदाचित पाहिले नसेल.
तुम्हाला हे पाहून थोडं आश्चर्य वाटेल की श्रीराम नेने केवळ माधुरीसोबत डान्स करत नाहीत तर माधुरी यांना डान्समध्ये टक्करही देत आहेत.
खरं तर, नुकताच माधुरी यांनी श्रीराम नेने यांचा वाढदिवस साजरा केला, त्यानिमित्ताने अभिनेत्रीने स्वतःचे आणि डॉ. नेनेचे काही न पाहिलेले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.
त्याचवेळी, आता या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये श्रीराम नेने माधुरीसोबत डान्स करताना दिसत आहेत, आणि जर योगायोग तर पाहा, नेने त्यांची पत्नी माधुरीसोबत संजय दत्त यांच्या 'तम्मा तम्मा' गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये डॉक्टर आणि माधुरी यांनी फूल ब्लॅक लूक केला आहे आणि ते 'तम्मा तम्मा' गाण्यावर डान्स करत आहेत. आणि दोघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत.