मुंबई : हिंदीतील अनेक कलाकारांना मराठी सिनेसृष्टीचं आकर्षण आहे. काहीजण अभिनयासाठी, काही दिग्दर्शनातून आणि काही थेट निर्मितीसाठी मराठी सिनेसृष्टीत आले.  अमिताभ बच्चन पासून अगदी प्रियांका चोप्राला मराठी सिनेमाची भूरळ पडली. आता या यादीमध्ये 'धकधक गर्ल' माधूरी दीक्षितचे नावही सामील झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माधुरी लवकरच एका मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे. योगेश विनायक जोशी लिखित आणि स्वप्नील जयकर दिग्दर्शित सिनेमाची‘आरएनएम मुव्हींग पिक्चर्स प्रा. लि.’या बॅनरअंतर्गत माधुरी  निर्मिती करणार आहे. या सिनेमाचे नाव अजून ठरले नाही. कलाकार आणि तंत्रज्ञांच्या निवड प्रक्रियेचे काम सुरू आहे. या वर्षाअखेरीस या सिनेमाच्या चित्रीकरणास सुरूवात करण्याचा टीमचा मानस आहे. नितीन वैद्य या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत. हा सिनेमा  पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येईल. 


एकीकडे परदेशात माधुरीवर मालिका करत असताना, दुसरीकडे ती आता स्वतः मराठीत येण्यास सज्ज झाली आहे.