दोन्ही मुलं घर सोडून जात असताना, माधुरीनं शेअर केली भावूक पोस्ट!
Madhuri Dixit : माधुरी दीक्षितची दोन्ही मुलं घर सोडून जात आहेत. यावर आता अभिनेत्रीनं पोस्ट शेअर करत याविषयी खुलासा केला आहे.
Madhuri Dixit : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही धकधक गर्ल म्हणून ओळखली जाते. माधुरी दीक्षित सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता देखील माधुरी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. माधुरी दीक्षितनं तिच्या दोन्ही मुलांसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्या दोघांना घर सोडून जाताना पाहून माधुरी खूप भावूक झाली आहे.
माधूरीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या दोन्ही मुलांसोबत फोटो शेअर केले आहेत. माधुरीची दोन्ही मुलं आता मोठी झाली असून पुढच्या शिक्षणासाठी त्यांचं घर सोडून परदेशात जात आहेत. माधुरीनं काल एक पोस्ट शेअर केली असून ती तिच्या दोन्ही मुलांसाठी आहे. माधुरीनं एक नाही तर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ते तिघेही इकडे तिकडे पाहत आहेत. तर दुसरा फोटो हा माधुरीचा कॅन्डिड असून ती हसत असून तिचे दोन्ही मुलं कॅमेऱ्यात पाहताना दिसत आहेत. हे दोन फोटो शेअर करत माधुरीनं कॅप्शन दिलं की 'माझी मुलं, तुम्ही इतक्या लवकर कॉलेजला कसे जाऊ शकता! वेळ कधी निघून गेली? पण तरी, मी तुम्हाला धम्माल आयुष्यासाठी आणि तुमचं बेस्ट व्हर्जन काय आहे हे जाणून घेण्यासाठी, उत्साही आहे. माझं नेहमीच तुमच्यावर प्रेम राहिली आणि तुम्ही नेहमीच आठवणीत रहाल. तुम्ही दोघे नसाल तर घर आधीसारखं नसेल.' या सोबत माधुरीनं लाल रंगाचं हार्ट इमोजी वापरलं आहे.
माधुरीनं शेअर केलेली ही पोस्ट पाहता लगेच अनेक चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. रितेश देशमुख कमेंट करत म्हणाला, हे सगळं प्रेम आहे. राजा कुमारी म्हणाली, किती गोड... माधुरीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तिच्या या पोस्टवर चाहते देखील कमेंट करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, माधुरी आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
हेही वाचा : 'तो' डायलॉग समीर वानखेडेंसाठी होता का? शाहरुखनं दिलं स्पष्टीकरण
काही महिन्यांपूर्वीच माधुरीचा छोटा मुलगा रयाननं हाय स्कूलमधून ग्रॅज्युएशन केलं होतं. त्याच्या ग्रॅज्युएशननंतर देखील माधुरीनं एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.