मुंबई : धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा पहिला वहिला मराठी सिनेमा 'बकेट लिस्ट' 26 मे रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा माधुरी दीक्षित अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घालायला सज्ज झाली आहे. असं असलं तरीही 1999 साली माधुरीने डॉ श्रीराम नेने यांच हृदय चोरलं होतं. असं म्हटलं जातं की डॉ श्रीराम नेनेंसोबत माधुरीचा अरेंज मॅरेज झालं आहे. मात्र नुकत्याच एका कार्यक्रमात माधुरी दीक्षित यांनी स्वतः आपली लव्हस्टोरी शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 16 व्या वर्षी म्हणजे 1984 मध्ये माधुरी यांनी 'अबोध' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  मात्र 1988 मध्ये 'तेजाब' या सिनेमातून माधुरी यांना वेगळी ओळख मिळाली. आणि त्यानंतर बॉलिवूडला मोहिनी घालण्यासाठी माधुरी दीक्षित सज्ज झाली. सिनेमांत करिअर करायचं की नाही यासाठी माधुरी दीक्षित यांनी आपल्या पणजीची परवानगी घेतली होती. आणि माधुरी दीक्षित या कथ्थक डान्सर असल्यामुळे अभिनयासाठी सहज घरातून परवानगी मिळाली. असा माधुरीचा सिनेमातील प्रवास सुरू झाला. 


अशी झाली डॉ श्रीराम नेनेंची ओळख


माधुरी यांना त्यांच्या भावाने एक दिवस तातडीने अमेरिकेला बोलावले. भावाने आपल्याकडे कधीच कोणती मागणी न केल्यामुळे याकरता माधुरी तयार झाली. सिनेमातील तारखा अॅडजस्टकरून माधुरी अमेरिकेला गेली. तिथे माधुरीच्या भावाने एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला डॉ श्रीराम नेने उपस्थित होते. या पार्टीच्या दुसऱ्या दिवशी माधुरी यांच्या भावाने आज पार्टीतील कोणत्या व्यक्तीला बोलवू अशी विचारणा केल्यावर त्यांनी डॉ नेनेंचे नाव घेतले. आणि मग अशा पद्धतीने त्यांची ओळख झाली आणि मग माधुरी दीक्षित आणि डॉ श्रीराम नेने यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.