मुंबई : बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईत बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवींच्या अकाली एक्झिक्टने कपूर कुटुंबीयांप्रमाणेच तिच्या चाहत्यांना ही धक्का बसला होता. मात्र हळूहळू कपूर कुटुंबीय कामामध्ये रमत आहे. 


श्रीदेवींच्या ऐवजी माधुरी दीक्षित झळकणार  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिषेक बर्मनच्या 'शिद्दत' या चित्रपटामध्ये श्रीदेवी काम करणार होत्या. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते. संजय दत्त, आलिया भट्ट, वरूण धवन अशा काही नावांवर शिक्कामोर्तबही झाले होते. मात्र श्रीदेवींच्या अकाली जाण्याने हा चित्रपट रद्द होऊ शकतो अशी चर्चा होती. 


जान्हवी कपूरने दिली माहिती 


श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूरने 'शिद्दत' चित्रपटामध्ये श्रीदेवींऐवजी माधुरी दीक्षित ही भूमिका साकारणार आहे. अशी माहिती दिली आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करताना जान्हवीने 'शिद्दत' हा सिनेमा श्रीदेवीसाठी खास होता. मात्र आता श्रीदेवीऐवजी माधुरी दीक्षित यांनी हा चित्रपट स्वीकारल्याने त्यांचे मी, खुशी आणि डॅड ( बोनी कपूर) आभारी आहेत अशी माहिती दिली आहे. 


 



कपूर कुटुंबीय कामात व्यग्र  


जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटाच्या शूटींगला पुन्हा सुरूवात केली आहे. खुशी आणि बोनी कपूरदेखील काही दिवसांपूर्वी 'हिचकी'च्या प्रिमियरला गेले होते. अर्जून कपूरच्या घरीदेखील बोनी कपूर, खुशी आणि जान्हवी कपूरने खास डिनर पार्टीला हजेरी लावली होती.