मुंबई : अनेक दिवसांपासून माधुरी दीक्षित मराठीत सिनेमात येणार याची चर्चा होती. मात्र अखेर बकेट लिस्ट या मराठी चित्रपटातून माधुरीने मराठी सिनेमात पाऊल ठेवण्याचं ठरवलं आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. 


 बकेट लिस्ट पूर्ण करणार माधुरी दीक्षित  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सर्वसामान्य मराठी गृहीणीच्या भूमिकेतील माधुरी दीक्षितचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते.  मात्र हा चित्रपट नेमका कसा असेल अशी उत्सुकता माधुरीच्या अनेक चाहत्यांच्या मनात होती. 
 
माधुरी चित्रपटात सई या  तिच्या मुलीच्या बकेट लिस्टमधील इच्छा पूर्ण करताना दिसत आहे. सईचा अकाली मृत्यू होतो पण तिची बकेट लिस्ट पूर्ण करण्याचा ध्यास तिच्या आईने घेतलेला आहे. तो कसा पूर्ण होतो हे पाहण्यासाठी 25 मेला माधुरीच्या चाहत्यांना सिनेमागृहात जावं लागणार आहे.  


 



 
माधुरी​ आणि रेणूका शहाणे पुन्हा एकत्र   


 'हम आपके है कौन' चित्रपटानंतर रेणूका आणि माधुरी पुन्हा बकेट लिस्ट या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहे.  तेजस देवोस्कर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही धर्मा प्रोडक्शनने केली आहे. या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षितसोबत सुमीत राघवन, सुमेध मुदगलकर, शुभा खोटे, वंदना गुप्ते, दिलिप प्रभावळकर यासारखे अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत सोबतच या चित्रपटात बॉलिवूडचा चॉकलेट हिरो रणबीर कपूर कॅमिओ म्हणून दिसणार आहे.