मुंबई : साऊथ सुपरस्टार धनुष नेहमीच हेडलाईन्समध्ये असतो. कधी त्याचे चित्रपट, तर कधी त्याचं वैयक्तिक आयुष्य, अनेकदा लोकांचं लक्ष त्याच्याकडे वेधून घेतलं जातं. मात्र, यावेळी धनुष अडचणीत सापडला आहे. वास्तविक, मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेत्याविरोधात समन्स बजावले आहे. हे प्रकरण एका जोडप्याशी संबंधित आहेत. ज्याने धनुष आपला मुलगा असल्याचा दावा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मद्रास उच्च न्यायालयाने धनुषविरोधात समन्स जारी केला
गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण सुरू आहे. आता या प्रकरणी न्यायालयाने धनुषला समन्स बजावले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केस करणार्‍या जोडप्याचं नाव कथिरेसन आणि त्यांची पत्नी मीनाक्षी आहे. धनुष हा त्यांचा मुलगा असल्याचा आरोप या दाम्पत्याने केला आहे. अभिनयाच्या निमित्ताने तो काही वर्षांपूर्वी घर सोडून चेन्नईला गेला होता.


धनुषचे खरे वडील असल्याचा दावा करणाऱ्या कथिरेसनने याप्रकरणी पोलिस चौकशीची मागणी न्यायालयाकडे केली आहे. यासोबतच धनुषने पितृत्व चाचणीचे जारी केलेले पेपर सादर केले आहेत. धनुषला आपला मुलगा म्हणणाऱ्या कथिरेसन आणि मीनाक्षी यांनी दरमहा ६५ हजार रुपये भरपाईची मागणी केली आहे.


पाच वर्षानंतरही हा प्रश्न सुटलेला नाही
गेल्या ५ वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, धनुषने या जोडप्याचे सगळे दावे फेटाळून लावले आहेत. विशेष म्हणजे धनुषने 2017 मध्ये ही केस जिंकली होती. आता कथिरेसन आणि मीनाक्षीने पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे. एवढंच नाही तर दोघांनीही पोलिस तपासाची मागणी केली आहे.