कोण ठरलं महाराष्ट्राची महामिनिस्टर? `या` वहिनी ठरल्या ११ लाखांच्या पैठणीच्या मानकरी
झी मराठी वाहिनी वरील होम मिनिस्टर हा कार्यक्रम हेले 18 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
मुंबई : झी मराठी वाहिनी वरील होम मिनिस्टर हा कार्यक्रम हेले 18 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. होम मिनिस्टरच्या महामिनिस्टर या परवाच्या विजेतील ११ लाखांची पैठणी मिळणार हे ऐकून अनेकांना थक्क केलं होतं. हि ११ लाखांची पैठणी पाहण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला होती. अखेर या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. ११ लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती.
ही पैठणी येवेले येथिल प्रसिद्ध पैठणी सेंटर येवले पैठणी गेल्या सहा महिन्यांपासून बनत होती. मुख्य म्हणजे ही साडी बनवण्याचं काम कापसे पैठणीमधील दिव्यांग विद्यार्थी तयार करत होते. या ११ लाखाच्या पैठणीमुळे या दिव्यांग्य मुलांसुद्धा रोजगार मिळाला आहे. त्यामुळे जिच्या पदरी ही साडी पडणं ती वहिनी भाग्यवानच असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही.
अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या १० जणींमध्ये ११ लाखांच्या पैठणीसाठी सामना रंगला आणि फायनलिस्ट वहिनींना टक्कर देत रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे वहिनी ठरल्या महामिनिस्टरच्या महाविजेत्या.
११ लाखांच्या या पैठणीला सोन्याची जर आणि अस्सल हिरे जडलेले आहेत. हि पैठणीला जिंकल्यावर वहिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आता या पर्वानंतर चर्चा रंगतेय ती म्हणजे होम मिनिस्टरच्या पुढच्या पर्वाची. हे पर्व खूपच खास असणार आहे. मुळात होममिनिस्टरचं पुढचं पर्व होममिनस्टक सखी या नावाने लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.