मुंबई :  अभिनेता मोहित रैना आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. त्याने नवीन वर्षात लग्नाचे फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. मोहितने आदितीशी लग्न केले असून लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे पोस्ट होताच व्हायरल झाले आहेत. मोहितच्या लग्नाचे फोटो चाहत्यांना खूप आवडले. अचानक लग्न केल्यानंतर मोहितने नुकतेच त्याच्या लग्नाबाबत काही खुलासे केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहितने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्याचे लग्न ठरले नव्हते. शेवटच्या क्षणी सर्व काही आखले गेले होते, ज्याबद्दल त्याला सांगण्याची संधी मिळाली नाही. मोहितने सांगितले की, लग्नाचा बेत ठरलेला नव्हता. हे अगदी अचानक घडले. जणू सर्व गोष्टी आपोआप योग्य ठिकाणी घडल्या. हे लग्न राजस्थानमध्ये पार पडले ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.



लग्नानंतरच्या प्रतिक्रिया अनपेक्षित 


मोहितने सांगितले की, त्याच्या लग्नाच्या घोषणेनंतर मला अशा प्रकारच्या प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. ते माझ्यासाठी सुंदर, भावनिक आणि हृदयस्पर्शी होते. लोक माझ्यावर किती प्रेम करतात याची मला जाणीव झाली.




साध्या पद्धतीत लग्न केल्याबद्दल मोहित म्हणाला की मी नेहमीच खाजगी व्यक्ती राहिलो आहे. ते क्षण माझ्यासाठी खूप खास होते. ज्याचे वर्णन शब्दात करता येत नाही. अदितीसोबतच्या पहिल्या भेटीबाबत देखील त्याने सांगितले आहे. मोहितने सांगितले की, आम्ही काही वर्षांपूर्वी भेटलो होतो. काही वर्षांनी आम्ही आमची मैत्री पुढे नेण्याचं ठरवलं. कोरोनाच्या काळात मी तिच्या कुटुंबाला भेटलो. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील लोकांना सोबत घेऊन पुढे नेण्याचे ठरले.