OMG 2 चा वाद, महाकाल मंदिराच्या मुख्य पूजाऱ्याने दिला इशारा म्हणाले `...अन्यथा FIR दाखल करू`
Oh My God 2: ओह माय गॉड 2 या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डानं कारवाई केलेली असून अक्षय कुमारच्या या बहुचर्चित सिनेमा A प्रमाणपत्र दिलं आहे. आता महाकाल मंदिराचे मुख्य पुजारी यांनी या चित्रपटातील दृश्य हटवण्याची मागणी केली आहे अन्यथा FIR दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
Oh My God 2: 'ओह माय गॉड 2' या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. परंतु सध्या या चित्रपटावरून वेगळाच वादंग सुरू झाला आहे. या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डानंही A प्रमाणपत्र दिलं आहे. त्यातून या चित्रपटातील 20 सीन्सना सेन्सॉर बोर्डानं कात्री लावली आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली आहे. आता या चित्रपटातील टीझरमध्ये महाकाल मंदिर दिसतं आहे. त्यातील एका सीनमुळे या मंदिरातील पुजारी भडकले असून तो भागही जर का या सीन म्हणून काढला नाही तर या चित्रपटाविरूद्ध आणि निर्मात्याविरूद्ध कारवाई करू अशी मागणीही केली आहे. त्यातून जर का हा सीन काढला नाही तर आम्ही एफआयआर दाखल करू असाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. आता या इशाऱ्यानंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांची पुन्हा एकदा गोची झाली आहे. आता यामुळे नक्की या चित्रपटाच्या प्रदर्शनात काही अडथळे येणार का असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.
नक्की हे प्रकरण काय आहे हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
मध्य प्रदेशमध्ये ओह माय गॉड या चित्रपटावरून वेगळाच वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डानं A सर्टिफिकेट दिलेले आहे त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनात आता काय अडथळे येऊ शकतात का असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. A सर्टिफिकेट म्हणजेच हा चित्रपट फक्त अडल्टच पाहू शकतात. या चित्रपटाचे अनेक सीन्सचं हे श्री महाकालेश्वर मंदिराच्या परिसरात झाले आहे. हे भारतातील लाखो भक्तांचे मंदिर आहे. ज्या मंदिरात दररोज लाखो भक्त दर्शनासाठी आणि आपल्या श्रद्धेसाठी येतात. तेव्हा या मंदिराच्या मुख्य पूजारी महेश शर्मा यांनी या चित्रपटाच्या निर्मात्यांवर मंदिराशी निगडीत जे सीन्स आहे जे धार्मिक आहेत त्यांना काढण्याचा इशारा दिला आहे. त्यातून देशातील अनेक राज्यांतून या चित्रपटाविरूद्ध आंदोलन सुरू झाली आहेत.
हेही वाचा - आई-वडील दोघंही सुपरस्टार, पण अभिनयात मुलगी फ्लॉप.. लग्न करून गेली परदेशात
महेश म्हणाले की, सेन्सॉर बोर्डानं तर या चित्रपटाला A प्रमाणपत्र दिलं आहे तेव्हा ही तर अश्लील फिल्म आहे. त्यामुळे महाकाल मंदिराचा जो काही शॉट येथे आहे तो त्यांनी काढून टाकला पाहिजे. आम्ही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनंती करतो आहोत. आम्ही सेन्सॉर बोर्डालाही विनंती करतो आहे. जर का तुम्ही शॉर्ट्स काढले नाहीत तर आम्ही FIR दाखल करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.