Mahalaxmi and Ravindra Chandrashekhar : लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. यामुळे रंग, रुप याचा कुठेच ताळमेळ बसणार नाही अशा जोड्या पहायाला मिळतात. मनोरंजन क्षेत्रात चार महिन्यांपूर्वी अशीच एक जोडी लग्नाच्या बेडीत अडकली. साऊथ अभिनेत्री तथा व्हीजे महालक्ष्मी(Mahalaxmi) आणि टॉलिवूड अर्थात साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध प्रोड्युसर रवींद्र चंद्रशेखरन (Ravindar Chandrasekaran) यांचा पारंपारिक विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नाच्या चार महिन्यानंतर महालक्ष्मीने फोटो शेअर करत आता त्यांच वैवाहिक आयुष्य कसं आहे याबाबत सांगितले आहे.


दोघांच्या दिसण्यावरून नेटकऱ्यांनी केल होतं ट्रोल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महालक्ष्मी आणि रवींद्र चंद्रशेखरन या दोघांचे हे दुसरे लग्न आहे. कुटुंबातील सदस्य आणि काही मित्र अशा मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत सप्टेंबर 2022 मध्ये त्यांचा विवाह सोहळा रितीरिवाजानुसार पार पडला. दोघांचा मोठा फॅन फॉलोईंग आहे. महालक्ष्मीने इंस्टाग्राम लग्नाचे फोटो शेअर केले होते.  त्यांचे फोटो पाहून सोशल मीडियावर चर्चेचं वादळ निर्माण झाले. अनेकांनी त्यांनीन शुभेच्छा दिल्या तर अनेकांनी त्यांची मिसमॅच जोडी पाहून त्यांची खिल्ली देखील उडवली. अनेकांनी या दोघांच्या दिसण्यावरून त्यांना ट्रोल देखील केले होते. "महालक्ष्मी एवढी सुंदर आहे तिने रवींद्रशी कसं काय लग्न केलं? पैश्याच्या पुढे सगळं झूट आहे", अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या होत्या. 


महालक्ष्मी ही साऊथची अभिनेत्री आहे.  'वाणी रानी','चेल्लामय', 'ऑफिस', 'अरसी', 'थिरु मंगलम', 'यामिरुक्का बयामेन', केलाडी कनमनी या 'टीव्ही सिरीयलमध्ये महालक्ष्मीने काम केलं आहे. तर, रवींद्र चंद्रशेखरन हा साऊथचा मोठा निर्माता आहे. 'नालनम नंदिनीयम', 'सुट्टा कढ़ाई', 'नत्पुना एन्नानु थेरियुमा', 'मुरुंगकाई चिप्स' या सिनेमांची त्याने निर्मिती केली आहे.


महालक्ष्मी आणि रवींद्र चंद्रशेखरन यांचे लग्नानंतरचे आयुष्य कसं आहे?


महालक्ष्मी आणि रवींद्र चंद्रशेखरन यांच्या लग्नाला चार महिने झाले आहेत. महालक्ष्मीने रवींद्र चंद्रशेखरन सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. Life is beautiful and so are you.... असं कॅप्शन महालक्ष्मीने या फोटोंना दिले आहे. या फोटोंमध्ये महालक्ष्मी कॅप्शन प्रमाणेच beautiful दिसत आहे. फक्त महालक्ष्मी नाही तर तिचं आयुष्य देखील beautiful झाले आहे. या फोटोंमध्ये महालक्ष्मीने रवींद्र चंद्रशेखरन टॅग केले आहे. या फोटोंमध्ये दोघेही खूप आंदी दिसत आहेत. महालक्ष्मी आणि रवींद्र चंद्रशेखरन यांच्या दुसऱ्या लग्नाची तिसरी गोष्ट  पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे.