मुंबई : सोशल मीडियाच्या या विश्वामध्ये सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, अमृता फडणवीस यांचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृता फडणवीस कायमच त्यांची गायनकला जोपासताना दिसतात. याच कलेच्या बळावर त्यांनी काही व्हिडीओही सर्वांच्या भेटीला आणले आहेत. 


सोशल मीडियावर आता त्यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. इथे त्या एक लोकप्रिय गाणं गुणगुणताना दिसत आहेत. 


'मानिके मागे हिते' या अतिशय गाजलेल्या गाण्याचं हिंदी व्हर्जन अमृता सादर करताना दिसत आहेत. 


श्रीलंकन गाण्यावर जिथे सर्वत्र रिल्सची धमाल सुरु असतानाच आता अमृता फडणवीस यांनीही या गाण्याचं व्हर्जन सादर केलं आहे. 


गाण्याच्या व्हिडीओमध्ये अमृता यांची अदाही पाहण्याची संधी मिळत आहे. 


अवघ्या काही वेळातच त्यांचा हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरुवातही केली आहे. 


काहींना अमृता यांचं हे गाणं भारी आवडलेलं दिसतंय, तर काहीजण मात्र गाण्याला नापसंती दर्शवताना दिसत आहेत. 



गाणं आवडण्यापेक्षा अनेकांनी आपली आवड जपणाऱ्या आणि राजकारणासोबत कला क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अमृता यांना दाद दिली आहे. 


पती, राजकारणात सक्रिय असतानाही अमृता फडणवीस त्यांची वेगळी ओळख विविध माध्यमांतून तयार करत आहेत. हे पाहून त्यांचं कौतुक करणाऱ्यांचा आकडाही वाढत आहे.