मुंबई : सेलिब्रिटी ट्विटसची चौकशी होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलीय. काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपच्या दबावाखाली भारतातील सेलिब्रेटीं ट्विट करत असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली होती. संपूर्ण ट्विट प्रकरणाच्या चौकशीची काँग्रेसच्या शिष्टमंडळानं मागणी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर आणि विराट कोहली यांच्या सहीत अन्य सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला गेल्यानंतर भारतीय सेलिब्रिटींनी एका आशयाचे ट्वीट केले होते.


या सेलिब्रिटींच्या ट्वीटचे बरेचसे शब्द कॉमन होते.  #IndiaTogether आणि #indiaAgainstPropganda या हॅशटॅगचा वापर करत ट्वीट केले. भारताचे हे अंतर्गत प्रकरण असल्याचे त्यांनी म्हटले. या सेलिब्रिटींनी दबावात येऊन ट्वीट केले. त्यामुळे याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी कॉंग्रेसने केली. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले. 



आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिआनाने शेतकऱ्यांच्या प्रदर्शनासंदर्भात ट्वीट केले होते. आपण यासंदर्भात का बोलत नाही ? असा प्रश्न तिने उपस्थित केला होता. पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग आणि मिया खलिफा सहीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनाथ ट्वीट केले होते.