मुंबई :  अभिनेता सलमान खान लोकांची मदत करण्यासाठी कायम अग्रेसर असतो. सलमान एक मोठा स्टार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या तर मोठी आहेचं  पण त्याला फॉलो करणाऱ्यांचा आकडा देखील मोठा आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सालमानवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र सरकार सलमान खानकडून कोरोना लसीची जाहिरात करणार आहे. जेणेकरुन जे लोक लस घेण्यास संकोच करतात त्यांना लसीचे दोन्ही डोस घेऊन या विषाणूपासून संरक्षण करता येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुस्लिमबहुल भागात कोरोनाविरोधी लस घेण्यास लोक संकोच करतात. त्यामुळे सलमान खानच्या मदतीने सरकार लोकांना लस घेण्यास प्रवृत्त करेल. प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, लसींच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे. परंतू काही भागात लसीकरणाची गती मंदावलेली आहे.



राजेश टोपे पुढे म्हणाले,  मुस्लिमबहुल भागात अजूनही लोक लस घेण्यास टाळाटाळ करतात. आम्ही सलमान खान आणि इतर धार्मिक लिडर्सची मदत घेण्याचे ठरवले आहे जे मुस्लिम समुदायाला लस घेण्यास पटवून देऊ शकतील. धार्मिक लिडर्स आणि चित्रपट कलाकार यांचा लोकांवर खूप प्रभाव असतो आणि लोक त्यांचे ऐकतात.


मुस्लिम समाजात सलमान खानचा जबरदस्त चाहतावर्ग आहे. त्याचा मोठा पुरावा ईदच्या निमित्ताने पाहायला मिळतो. जेव्हा चाहते त्यांच्या भाईजानचा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटाबाहेर गर्दी करतात. त्यामुळे आता सलमानचे चाहते 'भाईजान'च्या सांगण्यावरून लस घेतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.