मुंबई : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दीदींना रुग्णालात दाखल करण्यात आल्याचं कळताच अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियापासून ते अगदी कलार्तुळापर्यंत प्रत्येकानेच त्यांची प्रकृती उत्तम होण्यासाठी प्रार्थना केली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीसुद्धा एक पत्र लिहित दीदींच्या तब्येतीची विचारपूस करणारं एक पत्र लिहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तुमच्या प्रकृतीविषयी कळताच मला कालजी वाटली. मी आशा करतो की यात कोणतीच गंभीर बाब नाही. मी आशा करतो की, तुमची प्रकृती लवकरच पूर्वपदावर येईल', असं त्यांनी या पत्रात लिहिलं. 


महाराष्ट्रात सध्या राजकीय पेच निर्माण झाला असल्यामुले राज्यपालांच्या भूमिकेकडेही यादरम्यान अनेकांचं लक्ष आहे. त्यातच त्यांनी वेळ काढत दीदींची विचारपूस करणारं हे पत्र लिहिलं. 




दरम्यान, रविवारी रात्री उशीरा श्वसनाच्या त्रासामुळे लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मंगेशकर कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला लता मंगेशकर यांची प्रकृती स्थि असून, त्यांना लवकरच घरी पाठवण्यात येणार आहे.