मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिकांच्या चित्रीकरणाच्या सेटवर ६० वर्षांवरील कलाकारांना मज्जाव करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अभिनेते विक्रम गोखले चांगलेच संतापले आहेत. कलाकारांसाठी असा कायदा असेल तर मग ६० वर्षांवरील नेत्यांनी आपले राजीनामे द्यावेत. त्यांनी आधी निवृत्त व्हावे, असे विक्रम गोखले यांनी म्हटले. त्यामुळे आता राज्य सरकार या निर्णयाचा फेरविचार करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनमध्ये खुलतेय 'सई- आदित्य'ची प्रेमकहाणी

'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत काही दिवसांपूर्वीच मालिकांच्या चित्रीकरणाला अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली होती. त्यामध्ये शुटिंगच्या सेटवर ६० वर्षांवरील अधिक वयाचे कलाकार असू नये, असाही नियम होता. त्यामुळे मालिकेतील ज्येष्ठ कलाकार आणि निर्मात्यांची चांगलीच गोची झाली होती. 


'राज्यातील लॉकडाऊन उठवू, पण तुम्ही 'या' गोष्टीसाठी तयार आहात का?'

यानंतर मनोरंजनसृष्टीकडून ६५ वर्षांवरील कलाकारांनाही चित्रीकरणासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. परंतु सरकारने अद्याप त्यासाठी परवानगी दिलेली नाही. परंतु, या निर्णयामुळे ज्येष्ठ कलाकार भिकेला लागतील. ६५ वर्षांवरील कलाकार शुटिंगच्या सेटवर आपली काळजी घेतील. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना सेटवर जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विक्रम गोखले यांनी केली.


दरम्यान, सध्या लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक व्यवहार ठप्प आहेत. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ९,६१५ नवे रुग्ण मिळाले. तसेच शुक्रवारी राज्यात झालेल्या २७८ मृत्यूंपैकी मुंबईमध्ये सर्वाधिक ५४ मृत्यू झाले आहेत. मुंबईमध्ये आत्तापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या १,०६,९८० एवढी झाली आहे. त्यामुळे मुंबईतील परिस्थिती अजूनही गंभीरच आहे. त्यामुळेच राज्य सरकारकडून शक्य ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.