कोकणातील पहिला पाऊस ..., `हास्यजत्रा` फेम अभिनेत्यानं शेअर केला गावचा खास व्हिडीओ
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor`s Chiplun`s Video : `महाराष्ट्राची हास्यजत्रा` फेम अभिनेत्यानं शेअर केला चिपवळूचा खास व्हिडीओ...
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor's Chiplun's Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमानं फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण जगभरात असलेल्या लोकांना वेड लावलं आहे. या कार्यक्रमातून सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. या कार्यक्रमातील अभिनेका निखिल बनेला या कार्यक्रमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी निखिल बने हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आता त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कोकणातील पहिला पाऊस सांगितला आहे.
निखिल बनेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. निखिल यावेळी त्याच्या गावी चिपळूणला गावच्या पूजेसाठी गेला होता. यावेळी त्याचा गावतल्या पहिला पावसाविषयी सांगतिलं आहे. या व्हिडीओत निखिलनं त्याच्या गावच्या या पूजेचे फोटो आणि काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओला शेअर करत निखिलनं कॅप्शन दिलं आहे की पुन्हा चिपळूण प्रवास...
या व्हिडीओत निखिल त्याच्या या संपूर्ण प्रवासाविषयी सांगताना दिसतोय की तो जनशताब्दी एक्स्प्रेसनं गावी गेला. यावेळी त्यानं या गोष्टीचा खुलासा केला की त्या ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. त्यानंतर त्याला घेण्यासाठी गाडी आली होती. तर घरी जात असताना मध्ये थांबून त्यांनी आंब्याचा रस पिला आणि गावी पोहोचल्यानंतर तो पूजेच्या ठिकाणी गेला. तिथे गावातल्या सगळ्या बायका या एकत्र येऊन जेवण बनवताना दिसल्या. त्यानंतर पूजा होताच भजन आणि मग जेवणाची पंगत या सगळ्या गोष्टी त्यानं सांगितल्या आहेत. पहिल्या पावसाचे फोटो शेअर करत निखिलनं कॅप्शन दिलं होतं की 'गाव + पहिला पाऊस = सुख'
हेही वाचा : 'मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात...'; Timepass 3 फेम अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासा
निखिलची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड झाली आहे. ही पोस्ट पाहताच नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की अरे मला आमच्या गावच्या पूजेची आठवण आली. दरम्यान, ही पहिली वेळ नाही जेव्हा निखिल त्याच्या गावचा व्हिडीओ शेअर करताना दिसला. तर या आधी देखील निखिल गणवती असो किंवा पालखी सोहळा न चुकता प्रत्येक सणाला गावी जाताना दिसतो.