Samir Choughule Post for Sachin Goswami : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम कोरोनानंतर खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या कार्यक्रमात दिसणारे कलाकार कायमच चर्चेत असतात. या कार्यक्रमाने विनोदाच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवले. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अभिनेते समीर चौघुले यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे अभिनेते समीर चौघुले हे लोकप्रिय झाले. समीर चौघुले हे सोशल मीडियावर सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. ते विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतंच समीर चौघुले यांनी सचिन गोस्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत त्यांनी एक खास फोटोही पोस्ट केला आहे. 


आणखी वाचा : 'तुझं हृदय बंद करतोय...', प्रशांत दामलेंनी सांगितला हार्टअटॅकनंतरचा 'तो' किस्सा, म्हणाले 'ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर...'


समीर चौघुले काय म्हणाले?


"काही फोटोंना कॅप्शनची अजिबात गरज नसते. अफाट, अचाट आणि अद्वितीय सचिन गोस्वामी सर...वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा...सर तुम्ही आहात म्हणून शिकण सुरू आहे.....घडण सुरू आहे...एका जागी साचण बंद आहे... पुन्हा एकदा खूप शुभेच्छा ...", असे समीर चौघुले यांनी म्हटले आहे. 



समीर चौघुलेंच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. यावर अनेक जण कमेंट करत सचिन गोस्वामी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी पांढऱ्या केसांच्या राजकुमारना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! अशा कमेंटही केल्या आहेत. 


आणखी वाचा : मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, राज ठाकरेंच्या फोटो पोस्ट करत म्हणाली '18 वर्षे...'


दरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम 21 सप्टेंबर 2018 रोजी सुरु झाला. या कार्यक्रमामुळे समीर चौघुले, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, वनिता खरात, प्रथमेश शिवलकर, अरुण कदम, प्रियदर्शन इंदलकर, ओंकार भोजने, वनिता खरे, दत्तू मोरे, शिवाली परब हे कलाकार प्रसिद्धीझोतात आले. यातील काही कलाकारांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून एक्झिट घेतली आहे. सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकार हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत.