Shivali Parab's Crush : छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा लोकप्रिय कॉमेडी शोपैकी एक आहे. या कार्यक्रमानं सगळ्यांना खिळवून सोडलं आहे. तर या कार्यक्रमामुळे कलाकारांना ओळख मिळाली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. तर या कार्यक्रमातील अभिनेत्री आणि कॉमेडी क्वीन शिवाली परबचे लाखो चाहते आहे. शिवालीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. आता शिवालीनं तिच्या क्रशविषयी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवालीनं नुकतीच एका प्रतिष्ठीत माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या क्रशचं नाव सांगितलं आहे. आता शिवालीनं तिच्या क्रशचं नाव सांगताच अनेकांना आश्चर्य झाले. तर शिवालीच्या काही चाहत्यांना तिचं क्रश कोण आहे हे जाणून घ्यायची इच्छा आहे. शिवालीला तिच्या क्रश विषयी विचारण्यात येताच तिनं सांगितलं की 'मला शाहरुख खान खूप आवडतो. खूप म्हणजे प्रचंड आवडतो. कोणी विचार करू शकणार नाही इतकं माझं शाहरुखवर क्रश आहे. मी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पाहते की तो सरप्राइज द्यायला कुठेकुठे भेटायला जातो आणि त्यांच्या फॅन्सना भेटून सरप्राइज देतो वगैरे. असं काही माझ्यासोबत व्हायला हवं अशी माझी इच्छा आहे. एकंदरीत माझं शाहरुखवर खूप मोठं क्रश आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, शिवालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनी रील केले होते. या व्हिडीओत हास्यजत्रेतील कोहली फॅमिली दाखवण्यात आली होती. त्या कुटुंबात नम्रता संभेराव, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर आणि प्रसाद खांडेकर यांचे 'आवली लव्हली कोहली' हे कॉमेडी स्किट खूप गाजल होतं. त्याच्या डायलॉग्सच्या गंमतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. सगळ्यात आधी लोकांनी हे स्किट पुन्हा पुन्हा पाहण्यास सुरुवात केली. त्यांच्या या स्किटवर एका नेटकऱ्यांनी रिल केलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगु लागली होती. काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सच्या एका लोकप्रिय खेळाडूने गाण्यावर रील बनवले होते. रिले मेरेडिथने कोहली फॅमिली लिव्हरचा एक विनोदी व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला होता. 


हेही वाचा : प्रेक्षकांची प्रतिक्षा अखेर संपली! 'या' दिवशी होणार शाहरूख खानचा Jawan चित्रपट प्रदर्शित


दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवालीनं तिच्या एका बोल्ड फोटोशूटचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. शिवालीचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 205K फॉलोवर्स आहेत.