Vanita Kharat Haldi Photo and Video : सध्या सगळीकडेच लगीनघाई सुरु असल्याचे आपण पाहतोय. नुकतंच अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर के एल राहुल (KL Rahul) लग्नबंधनात अडकले आहेत. तर त्यानंतर आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) ही सप्तपदी घेणार आहे. वनितानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या लग्नाची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. दरम्यान, आता तिच्या हळीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. वनिताच्या हळीचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनिताच्या हळदीच्या कार्यक्रमातील फोटो तिच्या मित्रमैत्रिणींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये वनिताची हळद झाली असून ती आनंदात असल्याचे दिसत आहे. फक्त वनिता नाही तर तिचा होणारा नवरा सुमित देखील आनंदी आहे. तर काही फोटोंमध्ये वनिता ही डिजेच्या तालावर नाचताना देखील दिसली आहे. 



वनिताच्या हळीदाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. यात महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. काही महिन्यांपूर्वीच वनिताने ती प्रेमात असल्याची कबुली दिली होती. ती आणि सुमित लोंढे रिलेशनशिपमध्ये असून, लवकरच ते लग्न देखील करणार आहे. वनिता आणि सुमित यांनी दिवाळी आणि नवीन वर्ष एकत्रच साजरे केलं होतं. याचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. आज वनिताचं लग्न असून तिच्या लग्नाचे फोटो अजून समोर आले नाहीत. 



हेही वाचा : Kiara आणि Sidhharth Malhotra या दिवशी घेणार सप्तपदी! लग्नाची तारीख आणि ठिकाण ठरलं



'सरला एक कोटी' (Sarala Ek coti) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँन्चला आलेल्या वनिताने एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाची तारीख सांगितली होती. 2 फेब्रुवारी रोजी सप्तपदी घेत असल्याचे वनितानं सांगितले होते.  वनिताने अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. वनिताचा होणारा नवरा सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड आवड आहे. 



दरम्यान, वनिता आधी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर  (Akshaya Devdhar) यांनी सप्तपदी घेतल्या होत्या. त्या दोघांना फक्त छोट्या पडद्यावर नाही तर खऱ्या आयुष्यात एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.